Home /News /national /

कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे भारतात Alert, असे आहेत आरोग्यमंत्रालयाचे नवे नियम

कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे भारतात Alert, असे आहेत आरोग्यमंत्रालयाचे नवे नियम

पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना एका वेगळ्या आयसोलेशन युनिटमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांची सॅब स्टेस्ट घेऊन ते नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात येणार आहेत.

    नवी दिल्ली 22 डिसेंबर: ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे (coronavirus new strain)जगभर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे भारत सरकार अलर्ट झालं असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची त्यावर तातडीची बैठकही झाली आहे. केंद्र सरकार त्याबाबत अलर्ट असून आरोग्य मंत्रालयाने नवी नियमावलीही जारी केली आहे. यासंदर्भा काय केलं पाहिजे त्यासाठी सरकारने SOPही जाही केली आहे या नव्या निमांमुळे ब्रिटन आणि युरोपातून येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षेसाठी अनेक नियमांचं पालन करावं लागणार आहे. कोरोना व्हायरसमध्ये झालेल्या नव्या बदलांची माहिती ब्रिटनने जागतिक आरोग्य संघटनेला दिली आहे. त्यायवर अजून संशोधन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. युरोपीयन सेंटर फॉर डिसिज कंट्रोल ने दिलेल्या माहितीनुसार हा नवा व्हायरस जास्त वेगाने पसरणारा असून तो युवकांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचं म्हटलं आहे. नव्या नियमांनुसार आता ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावरच RT आणि PCR टेस्ट केली जाणार आहे. परदेशात प्रवास प्लॅन करत आहात? नव्या Corona नियमांबद्दल आधी हे जाणून घ्या पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना एका वेगळ्या आयसोलेशन युनिटमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांची सॅब स्टेस्ट घेऊन ते नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात येणार असून व्हायरसमध्ये काही बदल झाला आहे का याची तपासणी केली जाणार आहे. पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तिच्या चाचणीत व्हायरसमध्ये काही बदल झाला नसल्याचं आढळल्यास त्यांच्यावर आधीच्या नियमांप्रमाणेच उपचार करण्यात येणार आहेत. तर व्हायरसमध्ये बदल झाल्याचं आढळल्यास नव्या नियमांनुसार उपचार करण्यात येईल. या रुग्णांची 14 दिवसांनंतरची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यानंतरच्या दोन चाचण्या निगेटिव्ह येईपर्यंत त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. RT आणि PCR टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्या प्रवाशांना घरीच क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात येणार आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानात बसण्याआधीच या नियमांची माहिती दिली पाहिजे. त्यानंतर विमानातही त्याबाबत सूचना दिले पाहिजे, त्याचबरोबर विमानतळावरही त्याबाबत स्पष्ट बोर्ड लावणे गरजेचं असल्याचंही त्यात म्हटलेलं आहे. लोकांची भीती घालवण्यासाठी Joe Biden यांचा पुढाकार, LIVE TV वर घेतली कोरोना लस अशा पॉझिटिव्ह प्रवाशांच्या मागे आणि पुढे तीन रांगेत बसलेल्या प्रवाशांना संक्रमणाचा धोका असल्याने त्यांना आयसोलेट करण्यात येणार आहे. अशा प्रवाशांची माहिती प्रवाशांना कळवावी लागणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नोव्हेंबरपासून ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची माहिती प्रशासन गोळा करत असून त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली जाणार आहे. हा नवा व्हायरस हा जास्त पसरणारा असला तरी तो जिवघेणा नाही आणि त्याच्यासंदर्भात आणखी स्पष्टपणे कळालेलं नाही असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या