मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /धक्कादायक! एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण, सर्वांनी घेतली होती लस

धक्कादायक! एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण, सर्वांनी घेतली होती लस

अनेक मोठ्या शहरांमध्ये कोरोनानं (Covid-19) अक्षरशः थैमान घातलं आहे. अशात आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. दिल्लीत एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे.

नवी दिल्ली 09 एप्रिल : देशभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये कोरोनानं (Covid-19) अक्षरशः थैमान घातलं आहे. यात दिल्लीदेखील मागे नाही. अशात आता दिल्लीतून (Delhi) आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. इथे एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. हे प्रकरण आहे गंगाराम रुग्णालयातील. यातील पाच जणांना रुग्णालयत दाखल करण्यात आलं आहे. तर, इतर डॉक्टर सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या 37 डॉक्टरांपैकी बहुतेक जण कोरोना रुग्णांवर उपचार करणारे होते.

रुग्णालयातील पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व डॉक्टरांमध्ये काही हलकी लक्षणं असून कोणीही गंभीर स्थितीमध्ये नाही. दुसरीकडे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दिल्ली सरकारनं लोक नायक रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठीच्या बेडची संख्या 1000 वरुन वाढवून 1500 केली आहे. सोबतच जीटीबी रुग्णालयातील बेडची संख्या 500 वरुन 1000 केली आहे. याशिवाय दातांच्या डॉक्टरांनाही कोविड रुग्णालयांमध्ये ड्यूटीवर ठेवलं जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहाता, हा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Corona updates: राज्यातील कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी

मागील 24 तासाता दिल्लीत 7437 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, कोरोनामुळे चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे. आता दिल्ली कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 23181 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा वाढून 11157 वर पोहोचला आहे. मागील चोवीस तासांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 8.10 टक्के नोंदवला गेला आहे.

दुसरीकडे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. फक्त कोरोना रुग्णच नाही तर आता मृत्यूचा आकडाही वाढू लागला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात आज 08 एप्रिलला 56,286 नवीन रुग्णांचं निदान झालं आहे . तर, 376 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

First published:

Tags: Corona, Corona spread, Corona updates