मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Good News: 2 ते 18 वयोगटाला मिळणार Covaxin ही लस? तज्ज्ञांच्या टीमची शिफारस

Good News: 2 ते 18 वयोगटाला मिळणार Covaxin ही लस? तज्ज्ञांच्या टीमची शिफारस

लसीकरण हे कोरोनाला (Corona Vaccination) थोपवण्यासाठी महत्त्वाचं आहे. अशावेळी देशभरात विविध टप्प्यांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया (COVID-19 Vaccination Drive in India) सुरू आहे. याच संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट हाती आलं आहे

लसीकरण हे कोरोनाला (Corona Vaccination) थोपवण्यासाठी महत्त्वाचं आहे. अशावेळी देशभरात विविध टप्प्यांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया (COVID-19 Vaccination Drive in India) सुरू आहे. याच संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट हाती आलं आहे

लसीकरण हे कोरोनाला (Corona Vaccination) थोपवण्यासाठी महत्त्वाचं आहे. अशावेळी देशभरात विविध टप्प्यांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया (COVID-19 Vaccination Drive in India) सुरू आहे. याच संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट हाती आलं आहे

नवी दिल्ली, 12 मे: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात (Second Wave of Coronavirus in India) संघर्ष सुरू आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि लसीकरण ही त्रिसूत्री अंमलात आणण्याचं आवाहन केंद्र आणि राज्य सरकारांकडून वेळोवेळी केलं जात आहे. लसीकरण हे कोरोनाला (Corona Vaccination) थोपवण्यासाठी महत्त्वाचं आहे. अशावेळी देशभरात विविध टप्प्यांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया (COVID-19 Vaccination Drive in India) सुरू आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी तज्ज्ञांच्या पॅनेलने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची (Bharat Biotech's COVID-19 vaccine Covaxin) फेज II/III मध्ये 2 ते 18 वयोगटासाठी क्लिनिकल चाचण्यांसाठी शिफारस केली आहे.

2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिनच्या क्लिनिकल चाचण्या करण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये एम्स रुग्णालयात, पाटणामध्ये एम्स रुग्णालयात आणि नागपूरमधील मेडिट्रीना इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स याठिकाणी ही क्लिनिकल चाचणी घेण्यात येणार आहे. एकूण 525 सबजेक्ट्सवर या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

हे वाचा-SALUTE! स्वतः ऑक्सिजन सपोर्टवर असणारी व्यक्ती कोरोनाबाधितांना पोहोचवते ऑक्सिजन

त्यामुळे आता या तज्ज्ञांच्या शिफारशीनंतर 2 ते 18 वयोगटातील व्यक्तींसाठी लवकरच लस उपलब्ध होणार का? असा सवाल उपस्थित होतो आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या ( Central Drugs Standard Control Organization CDSCO) कोव्हिड-19 बाबतच्या सबजेक्ट एक्सपर्ट कमिटीने (SEC) कोव्हॅक्सिनच्या प्रस्तावावर मंगळवारी विचार केला. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला फेज II/III मध्ये 2 ते 18 वयोगटासाठी क्लिनिकल चाचण्यांसाठी परवानगी मिळावी अशी मागणी हैदराबाद स्थित भारत बायोटेककडून करण्यात आली होती. कोव्हॅक्सिन डोसची सुरक्षितता, रिअॅक्टोजेनिसीटी आणि इम्युमोजेनिसीटीचं मुल्यांकन करण्यासाठी ही परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर विचार केल्यानंतर या तज्ज्ञांच्या पॅनेलकडून याबाबत शिफारस करण्यात आली आहे.

हे वाचा-कोवॅक्सिन, कोविशिल्ड की स्पुतनिक V? तुम्हीच ठरवा कोणती कोरोना लस घ्यायची

मीडिया अहवालातील माहितीनुसार याआधीही भारत बायोटेककडून याबाबत परवानगी मागण्यात आली होती. 24 फेब्रुवारी रोजी ही परवानगी मागण्यात आली होती. दरम्यान त्यावेळी SEC ने या फर्मला क्लिनिकल ट्रायल साठी सुधारित प्रोटोकॉल पाठवण्यास सांगितले होते.

First published:

Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine in market, Coronavirus, Sanjeevani