Home /News /national /

कोवॅक्सिन, कोविशिल्ड की स्पुतनिक V? तुम्हीच ठरवा कोणती कोरोना लस घ्यायची

कोवॅक्सिन, कोविशिल्ड की स्पुतनिक V? तुम्हीच ठरवा कोणती कोरोना लस घ्यायची

 कोरोना वॅक्सिनच्या दोन डोसमधला गॅप फायदेशीर ?

कोरोना वॅक्सिनच्या दोन डोसमधला गॅप फायदेशीर ?

18+ कोरोना लसीकरण (Corona vaccination) सुरू होताच कोविन पोर्टलवर (Co-win) काही बदल करण्यात आले आहेत.

    नवी दिल्ली, 11 मे : देशातील कोरोनाचे प्रमाण वाढत असतानाच कोरोना लसीकरणालाही वेग आला आहे. 18+ नागरिकांचं कोरोना लसीकरण सुरू होताच कोरोना लसीकरण नोंदणीत अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नागरिकांना कोरोना लस निवडीचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे आता लोकांना हवी ती लस (Corona Vaccine) घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कोविन पोर्टलवर (Co-win) तसे बदल करण्यात आले आहेत. कोविन अ‌ॅपवर लशीसाठी नोंदणी (Vaccine Registration) करण्यापूर्वी कोणत्या लसीकरण केंद्रावर कोणती लस मिळत आहे, हेदेखील पाहता येऊ शकतं. यासह वयानुसार लसीकरण केंद्रं (Vaccination Point) शोधण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. कारण सर्व वयोगटातील लोकांना सर्व केंद्रांवर लस दिली जात नाही. कोरोना लस घेण्याआधी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. 18 ते 44 वयोगटातील सर्वांना फक्त ऑनलाईन नोंदणीच करता येते. कोविनवर नोंदणी केल्यानंतर लसीकरण केंद्राच्या निवडीची सुविधा देण्यात आली आहे. यावेळी कोणत्या केंद्रावर कोणती लस दिली जाते आहे, हे दिसतं. त्यामुळे लोक स्वतः लस निवडू शकतील. हे वाचा - ‘..नड्डा जी, मोदी जी ने देश बना दिया मौत का अड्डा जी’, शायरीच्या माध्यमातून सचिन सावंतांचा पंतप्रधानांवर हल्ला यापूर्वी सरकारने म्हटले होते की, लोकांना लस निवडण्याची सुविधा दिली जाऊ शकत नाही. पण आता हा बदल देखील आवश्यक आहे, असं सरकारी सूत्रांनी सांगितल्याचं हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे. ज्या लोकांना दुसरा डोस घ्यायचा आहे, त्यांना कोणत्या केंद्रात कोणती लस दिली जात आहे, हे माहीत असावं म्हणून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वास्तविक कोवॅक्सिन लशीचा पुरवठा कमी प्रमाणात आहे. तसंच ही लस काही केंद्रांवरच उपलब्ध आहे. दुसरं म्हणजे दीड महिन्यांपूर्वी एखाद्या व्यक्तीने ज्या ठिकाणी कोवॅक्सिन घेतलं आहे, त्याच केंद्रात पुढच्या खेपेस तीच लस उपलब्ध नसूही शकते. त्यामुळे आता एका लशीचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना त्याच लशीचा दुसरा डोस कोणत्या केंद्रावर दिला जात आहे, हे सहजपणे कळावं, यासाठी ही सुविधा कोविनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.  यामुळे आता कोणतीही व्यक्ती कोणत्याही केंद्रावर लस घेऊ शकते. तसंच लशींवर क्लिक करून केंद्रांचा शोध घेण्याची सोयही केली आहे. लसीकरण केंद्र शोधण्याची सुविधा याशिवाय, वयानुसार लसीकरण केंद्रे शोधण्याची सुविधादेखील पुरवली गेली आहे. 45 पेक्षा जास्त वयाच्या लोकांचे जेथे लसीकरण सुरू असेल, त्या केंद्रांवर इतर वयोगटातील लोकांना लस दिली जात असेलच असं काही नाही. बहुतेक राज्यांमध्ये 45 हून कमी वय असलेल्यांसाठी वेगळी लसीकरण केंद्रं तयार केलेली आहेत. तेव्हा गोंधळ टाळण्यासाठी वयानुसार लसीकरण केंद्र शोधण्याची सुविधादेखील पुरवली गेली आहे. आता लोकांना कोविनवर वयानुसार लसीकरण केंद्र शोधण्यातही मदत मिळत आहे. तसंच पिनकोड आणि जिल्हा आधारित लसीकरण केंद्राची माहिती देण्याची सुविधाही पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे वाचा - महाराष्ट्राची वाटलाच कोरोनामुक्तीकडे; आज 71,966 रुग्णांची कोरोनावर मात अपॉइंटमेंटशिवाय लसीकरण 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक कोणत्याही केंद्राच्या निवडीशिवाय नोंदणी करू शकतात. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, त्यांना चार अंकी एक विशेष सुरक्षा कोड मिळतो. तो लिहून घेऊन किंवा सेव्ह करून संबंधित व्यक्ती कोणत्याही लसीकरण केंद्रास भेट देऊ शकते. तिथं फोन नंबर आणि विशेष कोड सांगून ती व्यक्ती लस घेऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांना कोणत्याही एका लसीकरण केंद्रावर वाट पाहत थांबावं लागणार नाही. ही नवी सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविनवर अलीकडेच चार-अंकी विशेष सुरक्षा कोड देण्याची सुविधा झाली आहे. जेव्हा लस घेण्यासाठी आलेली व्यक्ती हा कोड सांगेल आणि तो कोड पोर्टलमध्ये नोंदवला जाईल, तेव्हाच लसीकरण झाले आहे, असं मानलं जाईल. यानंतरच लस घेतल्याचं प्रमाणपत्र तयार करून संबंधिताला दिलं जातं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या