कौतुकास्पद! स्वतः ऑक्सिजन सपोर्टवर असणारी व्यक्ती कोरोनाबाधितांना पोहोचवते ऑक्सिजन सिलेंडर

कौतुकास्पद! स्वतः ऑक्सिजन सपोर्टवर असणारी व्यक्ती कोरोनाबाधितांना पोहोचवते ऑक्सिजन सिलेंडर

'माणुसकीच्या नात्याने मी काम करतो. मी ऑक्सिजनचं महत्त्व आणि ते न मिळाल्यास होणारा त्रास जाणतो', असं 48 वर्षांचे मंजूर अहमद सांगतात, तेव्हा वाटतं कुठून येते एवढी हिंमत आणि पॉझिटिव्हिटी?

  • Share this:

श्रीनगर, 12 मे: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (corona second wave) हाहाकार माजवला आहे. अनेकांनी बेड्स (beds),ऑक्सिजन (oxygen) आणि व्हेंटिलेटर (ventilator) अभावी आपल्या जवळच्या लोकांना गमावलंय. तर,कित्येक कोरोना बाधितांनी उपचाराअभावी रस्त्यावर,रिक्षात,रुग्णालयाच्या पायऱ्यांवर तडफडून जीव सोडलाय. अशा या कठीण काळात अनेक लोक आपल्या परिस्थितीनुसार कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. महाष्ट्रातील एका तरुणानं त्याची गाडी विकून ऑक्सिजन सिलेंडर पुरवल्याची घटना तुम्हाला आठवतच असेल. अशातच दम्याचा आजार असलेला एक व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या मालवाहू वाहनातून कोरोनाबाधितांना ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवत आहे. मंजूर अहमद असं या 48 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. याबाबतचे वृत्त नवभारत टाईम्स आणि DNA नं दिलंय.

मंजूर अहमद हे काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात राहतात. दम्याचा आजार असल्यानं ते गेल्या 3 वर्षांपासून ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. अशा परिस्थितीतही ते एका छोट्या मालवाहू ट्रकमधून कोरोनाबाधितांना ऑक्सिजन सिलेंडर्स नेऊन देतात. मंजूर अहमद ‘डीएनए’शी म्हणाले, ‘मी ऑक्सिजनचं महत्त्व आणि ते न मिळाल्यास होणारा त्रास जाणतो, त्यामुळे मला शक्य आहे तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न करतो. मी माणुसकीच्या नात्यानं हे काम करतो. वेळेत मी कोणत्याही बाधितापर्यंत ऑक्सिजन पोहोचवू शकलो,त्याचा जीव वाचवू शकलो किंवा त्याची मदत करू शकलो तर मला चांगलं वाटतं.

असामान्य! छोट्या मुलीचा ज्या अँम्ब्युलन्समध्ये वडिलांच्या मांडीवर गेला जीव पण...

आपल्या हातून काहीतरी चांगलं घडलं,ही भावना मनाला आनंद देणारी असते. मला स्वताःला दम्याचा आजार आहे,जेव्हा सॅचुरेशन लेव्हल कमी होते,तेव्हा रुग्णाची काय अवस्था होते,याची जाणीव मला आहे. त्यामुळेच मी लोकांची मदत करतो.’

मंजूर म्हणतात,‘माझंही कुटुंब आहे,मला त्यांना चांगलं आयुष्य द्यायचंय त्यामुळे आयुष्यात मी इतक्या लवकर हार मानू शकत नाही. मला कुटुंबाचं पोट भरायचंय,स्वतःच्या महागड्या औषधांसाठी मला महिन्याला 6 ते 7 हजार रुपये लागतात,त्यामुळे मला घरात बसून चालणार नाही. मला काम करावच लागेल. तसेच कोरोनाच्या या कठीण काळात सगळ्यांनी हिम्मत ठेवा,हिम्मत ठेवू आणि एकमेकांची मदत करू तरच आपण या महामारीचा सामना करू शकू,’ असंही मंजूर म्हणतात.

Toilet pipe मधूनही कोरोनाव्हायरस तुमच्या घरात घुसू शकतो का?

मंजूर अहमद यांचा आत्मविश्वास आणि मदत करण्याची भावना कौतुकास्पद आहे. ते केवळ ऑक्सिजन सिलेंडर नेऊन देत नाहीत,तर खाली सिलेंडर पुन्हा भरून आणण्यासाठीही मदत करतात.मंजूर यांच्यासारख्या लोकांच्या निस्वार्थ मदतीमुळे अनेकांचे जीव वाचताहेत.

First published: May 12, 2021, 7:33 AM IST

ताज्या बातम्या