मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /लवकरच नाकातून घेता येणार कोरोनाची लस! Nasal Vaccine च्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी, वाचा फायदे

लवकरच नाकातून घेता येणार कोरोनाची लस! Nasal Vaccine च्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी, वाचा फायदे

कंपनीनं अशी माहिती दिली आहे, की महिला टप्प्यात ज्या व्यक्तींवर या लसीचं (Nasal Covid Vaccine) ट्राय़ल घेण्यात आलं, त्यांच्या शरीरानं या लशीच्या डोसला अगदी सहजपणे स्वीकार केलं. कोणाकडूनच काही साईड इफेक्ट झाल्याची माहिती मिळाली नाही.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 14 ऑगस्ट : कोरोनाविरोधातील लढ्यात भारताला लवकरच आणखी एक लस (Corona Vaccine) उपलब्ध होणार आहे. ही लस नाकातून ड्रॉपच्या माध्यमातू दिली (Bharat Biotech's Nasal Covid Vaccine) जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, ही लस भारत बायोटेककडून (Bharat Biotech) विकसित केली जात आहे. कंपनीला या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे. या लसीला क्लिनिकल चाचण्यांसाठी नियामक मान्यता प्राप्त झाली आहे.

कोरोना लढ्यात पुण्या-मुंबईला अजून जमलं नाही ते या शहरानं करून दाखवलं!

जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT) सांगितलं की, या औषधाच्या चाचणीचं पहिलं ट्रायल 18 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांवर करण्यात आलं. जे पूर्णपणे यशस्वी झालं आहे.

DBT नं म्हटलं, की नाकातून दिली जाणारी भारत बायोटेकची ही पहिली नेजल लस आहे. याच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे. याआधीही डीबीटनं म्हटलं होतं, की कंपनीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी मंजुरी मिळाली आहे. ही अशा प्रकारची कोरोनाची पहिली लस आहे, जिचं ट्रायल भारतात माणसांवर होणार आहे.

कोरोना महासाथीत जन्मलेल्या बालकांबाबत धक्कादायक माहिती आली समोर

DBT नं सांगितलं, की कंपनीनं अशी माहिती दिली आहे, की महिला टप्प्यात ज्या व्यक्तींवर या लसीचं ट्राय़ल घेण्यात आलं, त्यांच्या शरीरानं या लशीच्या डोसला अगदी सहजपणे स्वीकार केलं. कोणाकडूनच काही साईड इफेक्ट झाल्याची माहिती मिळाली नाही. याआधी केल्या गेलेल्या अभ्यासातही ही लस सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. DBT नं म्हटलं, की प्राण्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासात ही लस उच्च स्तरावर अँटीबॉडीज बनवण्यात यशस्वी ठरत असल्याचं दिसलं आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Corona vaccine in market