मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोना लढ्यात पुण्या-मुंबईला अजून जमलं नाही ते या शहरानं करून दाखवलं!

कोरोना लढ्यात पुण्या-मुंबईला अजून जमलं नाही ते या शहरानं करून दाखवलं!

दिल्लीपासून ते मुंबई-पुण्यापर्यंत कुठल्याच बड्या शहराला जमलं नाही ते या शहरानं करून दाखवलं. 100 टक्के लसीकरण झालेलं पहिलं मोठं शहर.

दिल्लीपासून ते मुंबई-पुण्यापर्यंत कुठल्याच बड्या शहराला जमलं नाही ते या शहरानं करून दाखवलं. 100 टक्के लसीकरण झालेलं पहिलं मोठं शहर.

दिल्लीपासून ते मुंबई-पुण्यापर्यंत कुठल्याच बड्या शहराला जमलं नाही ते या शहरानं करून दाखवलं. 100 टक्के लसीकरण झालेलं पहिलं मोठं शहर.

    इंदौर, 13 ऑगस्ट: गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीपासून आपला देश या छोट्या विषाणूशी (Coronavirus Third Wave) लढतो आहे. लाटांवर लाटा झेलतो आहे. लस (Corona Vaccine) आली की सगळं ठीक होईल असं म्हणत म्हणत लस भारतात येऊनही आता सहा महिन्यांचा काळ लोटला. पण अजूनही कोरोनाव्हायरचा (Covid-19 India) धोका कमी झालेला नाही. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, स्वच्छता आणि अर्थातच 100 टक्के लसीकरण (Corona Vaccination target) हेच या विषाणूला आटोक्यात आणायचे मार्ग आहेत. पण अद्याप लसीकरणाचं (Corona Vaccine) लक्ष्य कुठल्याच मोठ्या शहराला साध्य करता आलेलं नाही. जे दिल्लीपासून ते पुण्या-मुंबईपर्यंत कुठल्याच मेट्रो सिटीला जमलं नाही ते मध्य प्रदेशातल्या इंदौरने (Indore becomes 100 Percent vaccinated city)करून दाखवलं. आज इंदौर शहर (Indore news) 100 टक्के Vaccinated City झाल्याचं तिथल्या आयुक्तांनी सांगितलं.

    इंदौरच्या कमिशनल प्रतिभा पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातल्या लसीकरणास पात्र असलेल्या व्यक्तींची संख्या (Target Population for Vaccination) 1881072 एवढी होती. शुक्रवारपर्यंत इंदौर शहरातल्या 1882208 नागरिकांना कोरोना लशीचा किमान एक डोस तरी मिळालेला आहे. लसीकरणाचं लक्ष्य साध्य करणारं इंदौर हे देशातलं पहिलं मोठं शहर ठरलं आहे.

    Delta ची दहशत: Corona Vaccine च्या दोन डोसनंतरही 87 हजार जणांना इन्फेक्शन

    आयुक्त प्रतिभा पाल यांनी इंदोरच्या नागरिकांचं यासाठी अभिनंदन केलं आहे. नागरिक लसीकरणाबाबत जागरुक असल्याने हे घडलं, असं त्या म्हणाल्या. आता ठरलेल्या वेळी दुसरा डोसही नागरिकांनी अवश्य घ्यावा आणि संपूर्ण लसीकरण (Fully Vaccinated City) झालेलं शहर म्हणून शहराचा मान वाढवावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

    'Mixing vaccine नको कारण...', सायरस पूनावालांनी सांगितला सर्वात मोठा धोका

    दरम्यान देशात आणि महाराष्ट्रातही कोरोना विषाणूचं नवं रूप पुन्हा थैमान घालतंय. डेल्टाच्या पुढचं रूप (Mutation of Coroanvirus) Delta Plus समोर आलं आहे. राज्यातल्या 17 जिल्ह्यात डेल्टा प्लस कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 66 रुग्ण आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही आकडेवारी जारी केली आहे.

    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Indore, Madhya pradesh