मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनाला रोखणारा फॉर्म्युला तयार; व्हायरस मानवी पेशीमध्ये एंट्रीच करू शकणार नाही

कोरोनाला रोखणारा फॉर्म्युला तयार; व्हायरस मानवी पेशीमध्ये एंट्रीच करू शकणार नाही

हे रसायन कोरोनाव्हायरसला ब्लॉक करणार.

हे रसायन कोरोनाव्हायरसला ब्लॉक करणार.

हे रसायन कोरोनाव्हायरसला ब्लॉक करणार.

  वॉशिंग्टन, 13 ऑक्टोबर : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) जगभर झालेल्या संसर्गाने सगळ्या जगाला हादरवून टाकलं. सगळं जग प्रदीर्घ काळ ठप्प होण्याचा अनुभव या कोरोना विषाणूच्या साथीमुळे (Coronavirus Pandemic) आला. आतापर्यंत एकाच वेळी जगभरात इतक्या प्रचंड प्रमाणात साथ पसरण्याचा हा अलीकडच्या काळातला हा पहिलाच प्रसंग असावा. न भूतो न भविष्यति अशी स्थिती या कोरोना विषाणूने आणली. गेली दीड वर्षे या साथीनं सगळ्या जगाला वेठीला धरलं आहे. अब्जावधी जणांना या आजाराची लागण झाली, तर कोट्यवधी जणांचे जीव गेले. अनेक देशांची आर्थिक, सामाजिक रचनाच बदलून गेली. कोरोनाचा संसर्ग झाल्याचं लक्षात येताच यावर उपचार करण्यासाठी औषध शोधण्याकरिता जगभरातल्या शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केलं. अथक मेहनतीनंतर यावर लस (Vaccine) निर्माण करण्यात यश आलं आणि जगाची यातून सुटका होण्याचा मार्ग मिळाला.

  या नव्या विषाणूवर मात करणारं औषध शोधून काढण्यासाठी जगभरात अनेक ठिकाणी संशोधन सुरूच आहे. त्यापैकी अमेरिकेतल्या (USA) वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेने सार्स (SARS), तसंच कोरोनापासून संरक्षण देणारं एक विशेष रसायन (Chemical) बनवल्याचा दावा केला आहे. या शास्त्रज्ञांनी असं एक रासायनिक संयुग (Chemical Compound) विकसित केलं आहे, जे सार्स-सीओव्ही-2 या विषाणूमुळे होणारा संसर्ग रोखू शकतं.

  हे वाचा - पुण्यातून आली चिंता वाढवणारी बातमी; कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळली नवी बुरशी

  'MM3122'असं या संयुगाचं नाव असून ते मानवी पेशींवर हल्ला करणाऱ्या अनेक विषाणूंना कमकुवत करू शकतं. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं लवकरात लवकर लक्षात आल्यानंतर हे औषध दिल्यास कोविड-19ची (Covid-19) तीव्रता कमी होऊ शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

  प्रोसीडिंग्स ऑफ दी नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि संक्रमणासाठी कोरोना विषाणू ज्या प्रोटीनचा वापर करतो, त्या ट्रान्समेम्ब्रेन सेरीन प्रोटीज 2ला (TMPRSS2) हे संयुग लक्ष्य करतं. त्यामुळे विषाणूंना पेशीमध्ये जाण्यास अटकाव केला जातो, असं यात प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटलं आहे.

  हे वाचा - गर्भवती महिलांनो काळजी घ्या! कोरोनाचा तुमच्या बाळावरही होतो परिणाम

  या संशोधनाचे लेखक आणि वॉशिंग्टन विद्यापीठातले (Washington University) प्राध्यापक जेम्स डब्ल्यू जेनेटका यांनी सांगितलं, 'सार्स-सीओव्ही -2 वरील लस आता अस्तित्वात आहे. तरीही या जागतिक साथीची तीव्रता कमी करण्यासाठी प्रभावी 'अँटिव्हायरल' औषधांची गरज आहे. कोविड -19 प्रतिबंधात्मक औषधांचा घटक बनू शकेल, असं रसायन विकसित करणं हे या अभ्यासाचं उद्दिष्ट आहे.

  First published:
  top videos

   Tags: Corona, Coronavirus