नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर: संपूर्ण जग कोरोना व्हायरस (Corona Virus) या महामारीचा सामना करताना दिसत आहे. अजूनही काही देशात कोरोनाचा प्रार्दुभाव पाहायला मिळतो. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जाताहेत. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधक लस खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जगभरात कोरोना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. अशातच भारत देशातील कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण (Vaccination) मोहीम राबवली जात आहे. त्यातच भारत देश लसीकरणाबाबत नवनवे विक्रमही मोडीत काढत आहे. आता आरोग्य मंत्रालयानं सेलिब्रेशनची तयारी सुरु केली आहे. कारण लवकरच देश 100 कोटी किंवा एक अब्ज लस डोस देण्याचा विक्रम करणार आहे.
यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा सरकार विचार करत आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत हे लक्ष्य साध्य केलं जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय संपूर्ण भारतभर कार्यक्रमांसह हा दिवस साजरा करण्याची योजना आखत आहे. सूत्रांनी न्यूज 18 ला सांगितलं की, यामध्ये कोविड -19 योद्धा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याचं नियोजन आहे, जे लसीकरण मोहिमेमध्ये सर्वात प्रमुख आहे.
आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना 100 कोटी डोस पूर्ण झाल्याच्या सेलिब्रेशनच्या वेळी कोविड -19 योद्ध्यांचा सन्मान कसा करावा याविषयी त्यांचे विचार मांडण्यास सांगितलं आहे. या कोविड योद्ध्यांमध्ये कर्तृत्व बजावताना जीव गमावलेल्यांचाही समावेश आहे. NDTV च्या मते, भारत पुढील आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारपर्यंत हे लक्ष्य साध्य करेल.
लसीकरणाचा आकडा 96 हजार पार
ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड -19 लसीकरण 96.78 कोटी (96,78,08,545) पार केलं आहे. ज्यात बुधवारी संध्याकाळी 7 पर्यंत 32 लाखांपेक्षा जास्त (32,36,997) लसीचे डोस देण्यात आले आहेत.
10 ऑक्टोबर रोजी देशात लसीकरणाची संख्या 95 कोटींवर पोहोचल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी स्तुती केली होती आणि असेही म्हटलं होतं की भारत लवकरच 100 कोटीं लसीकरणाचा टप्पा गाठेल.
16 जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात
देशव्यापी लसीकरण मोहिम 16 जानेवारी रोजी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या (HCWs) लसीकरणासह पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आली. कोविड -19 विरुद्ध आघाडीच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण 2 फेब्रुवारीपासून सुरू झाले.
हेही वाचा- गडकरींची रेकॉर्ड तोड कारवाई; Road Accidentनंतर पीडित व्यक्तीची तक्रार, अवघ्या 2 तासात रस्ते दुरुस्ती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona virus in india, Coronavirus