नवी दिल्ली 05 ऑक्टोबर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Coronavirus Third Wave) धोका कायम आहे. कोणत्याही कारणामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत गेली तर काही राज्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट भयावह रूप धारण करू शकते. तज्ञांनी याबाबत चेतावणी जारी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे, की सुट्टीचा कालावधी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता 103 टक्क्यांनी वाढवू शकतो आणि त्या लाटेत संक्रमणाची (Coronavirus Infection) प्रकरणे 43 टक्क्यांनी वाढू शकतात. संशोधकांनी म्हटलं आहे, की सुट्टीच्या काळात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे लोकसंख्येच्या घनतेत अचानक वाढ आणि सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कारणांसाठी मोठ्या संख्येने होणाऱ्या संमेलनांमुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढू शकतात. आवश्यक आणि जबाबदार प्रवासावर भर देत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की काही राज्यांमध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती भीषण असू शकते. मित्राला लसीकरणासाठी तयार करा आणि मिळवा मोफत जेवण किंवा सिनेमा अभ्यासात तज्ञांनी भारतातील एका काल्पनिक राज्यात काही संभाव्य परिस्थितीचे चित्रण केले जे पहिल्या आणि दुसऱ्या लाटांमध्ये हिमाचल प्रदेशमधील परिस्थिती दाखवण्यासाठी डिझाइन केलेलं होते. संशोधकांनी ‘ओपीनियन पीस’ मध्ये म्हटले आहे, ‘पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे लोकसंख्येच्या घनतेत अचानक वाढ आणि सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कारणांसाठी मोठ्या संख्येने होणाऱ्या मेळाव्यामुळे तिसऱ्या लाटेची परिस्थिती बिघडू शकते. हिमाचल प्रदेशमधील आकडेवारी दर्शवते की सामान्य सुट्टीच्या काळात पर्यटनामुळे लोकसंख्येत 40 टक्के वाढ होऊ शकते. हे लक्षात घेता, सुट्टीचा कालावधी नसताना निर्बंध कमी करण्याच्या तुलनेत सुट्टीच्या हंगामात तिसऱ्या लाटेची शक्यता 47 टक्क्यांनी वाढू शकते आणि दोन आठवड्यांआधीच या लाटेचा पीक येऊ शकतो, असे संशोधकांनी सांगितले. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि अनेक राज्ये यामुळे प्रभावित झाली होती. भारतातल्या लसीकरणासंदर्भातली मोठी बातमी, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले… मनाली आणि दार्जिलिंग सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांचे उदाहरण देत संशोधकांनी सांगितले की निरीक्षणे असे दर्शवतात की ज्या भागात अधिक लोकसंख्येंची प्रतिकारशक्ती अद्याप विकसित झालेली नाही तिथे संसर्गाचा वाढता धोका आहे. ‘जबाबदार प्रवासा’चा प्रस्ताव देताना, संशोधकांनी सांगितले की मास्कचा वापर आणि पर्यटकांद्वारे सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण सिद्ध होऊ शकते. त्यांनी म्हटलं, की प्रवास करणाऱ्यांनी कोरोना लस घेतली असेल तर हेदेखील तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.