• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • मित्राला लसीकरणासाठी तयार करा आणि मिळवा मोफत जेवण किंवा सिनेमा, ‘या’ देशाची अनोखी ऑफर

मित्राला लसीकरणासाठी तयार करा आणि मिळवा मोफत जेवण किंवा सिनेमा, ‘या’ देशाची अनोखी ऑफर

आपल्या मित्राला कोरोनाची लस घेण्यासाठी तयार केलं आणि त्यानं लस घेतली तर तुम्हाला मनपसंत हॉटेलमध्ये (Free meal on convincing friend for vaccination) मोफत भोजन देण्याची घोषणा सरकारने केली आहे.

 • Share this:
  बर्न, 2 ऑक्टोबर : आपल्या मित्राला कोरोनाची लस घेण्यासाठी तयार केलं आणि त्यानं लस घेतली तर तुम्हाला मनपसंत हॉटेलमध्ये (Free meal on convincing friend for vaccination) मोफत भोजन देण्याची घोषणा सरकारने केली आहे. तुम्हाला जेवण नको असेल, तर तुम्ही तुमच्या आवडत्या सिनेमागृहात (Free lunch or free movie offered by government) मोफत सिनेमा पाहू शकता. स्वित्झर्लंडनं देशातील लसीकरणाचा वेग (New scheme by Switzerland government to increase vaccination) वाढवण्यासाठी ही अनोखी योजना आखली आहे. लसीकरणाचा वेग कमी स्वित्झर्लंडमध्ये लसीकरणाचा वेग कमी आहे. देशात मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध असूनदेखील नागरिक लसीकरण करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे. स्वित्झर्लंडमध्ये लसीकरणाच्या विरोधात अनेक मोर्चे आणि आंदोलनं झाली होती. त्यामुळे लसीकरण करू नये, या मताचे अनेक नागरिक देशात आहेत. यामुळे लसीकरणाचा अपेक्षित वेग गाठणे सरकारला शक्य होत नसून अधिकाधिक वेगाने लसीकरण होण्यासाठी ही ऑफर देण्यात आली आहे. काय आहे ऑफर? स्वित्झर्लंड सरकारने दिलेल्या ऑफरनुसार जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या मित्राला किंवा इतर कुठल्याही लसीकरण न झालेल्या नागरिकाला लस घेण्यासाठी प्रवृत्त केलं, तर त्याला सरकार बक्षीस देणार आहे. यात मोफत भोजन करा किंवा मोफत चित्रपट पाहा, असं सरकारनं म्हटलं आहे. स्वित्झर्लंडची लोकसंख्या ही साधारण 87 लाखांच्या घरात आहे. यापैकी 42 टक्के नागरिकांचं लसीकरण अद्याप झालेलं नाही. युरोपातील सरासरीचा विचार करता हा आकडा गंभीर असून लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. हे वाचा - कमी होतेय पृथ्वीची चमक, हवामान बदलाचे भयावह परिणाम; पाहा PHOTOs दरम्यान, भारतातील लसीकरणाने  90 कोटी डोस देण्याचा पल्ला पार केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. या वर्षअखेर 90 कोटी नागरिकांना दोन्ही डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
  Published by:desk news
  First published: