नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: देशात कोरोना व्हायरसचा (corona virus) प्रार्दुभाव कमी झालेला दिसत आहे. देशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लसीकरणाचा ( Corona Vaccination) वेग वाढवण्यात आला. याच संदर्भात आता चांगली बातमी समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय (The Union Ministry of Health) देशातल्या लसीकरणासंदर्भात (vaccination) महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितलं की, आतापर्यंत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड -19 लसीचे 88.14 कोटीहून अधिक डोस (Doses) देण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं (Central Government) हे डोस मोफत आणि राज्यांच्या थेट खरेदीद्वारे दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली की भारतानं 90 कोटी कोविड 19 लसीकरणांचा टप्पा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, लसीचे 5.28 कोटींपेक्षा जास्त डोस अद्याप राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहेत, जे अद्याप वापरले गेले नाहीत.
"India crosses the landmark of 90 crore COVID19 vaccinations", tweets Union Health Minister Mansukh Mandaviya
— ANI (@ANI) October 2, 2021
(file photo) pic.twitter.com/Uzu64xlGgy
दरम्यान भारतात कोरोना लसींची संख्या आता 90 कोटींच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केलं की, भारतानं 90 कोटी कोविड 19 लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. हेही वाचा- बापरे! पाकिस्तानमध्ये 127 रुपये लिटर पेट्रोल, पंतप्रधानांचं स्पष्टीकरण ऐकून लोक उडवतायत खिल्ली मंत्रालयानं सांगितलं की, गेल्या 24 तासांमध्ये देशभरातील नागरिकांना 69.33 लाख (69 लाख 33 हजार 838) पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने सांगितले की शुक्रवारी भारतात कोरोना व्हायरससाठी 14 लाख 29 हजार 258 नमुने चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर देशातील नमुना चाचणीचा आकडा आता 57 कोटी 19 लाख 94 हजार 990 झाला आहे. देशात कोरोना लसीकरण आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, सरकारनं आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीचे एकूण 88 कोटी 14 लाख 50 हजार 515 डोस दिले आहेत. केंद्र सरकार कोविड -19 लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि देशभरात त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. हेही वाचा- कृषी कायद्यांना विरोध हे राजकीय कपट, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल पुढे मंत्रालयानं म्हटलं की, अधिक लसींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. लसींची उपलब्धता सुलभ करणं आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी लस पुरवठा करणं हे मुख्य उद्दिष्ट्य आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून, सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत कोविड -19 लस पुरवत आहे. लसीकरण युनिव्हर्सलायझेशन मोहिमेअंतर्गत, केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे उत्पादित होणाऱ्या 75 टक्के लस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवणार असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे.