जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Coronavirus: सावधान! कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही; 'हे' राज्य वाढवतायेत चिंता

Coronavirus: सावधान! कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही; 'हे' राज्य वाढवतायेत चिंता

चालू आठवड्यात देशभरात एकूण 2.9 लाख कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

चालू आठवड्यात देशभरात एकूण 2.9 लाख कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

केरळमधील (Kerala) स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. राज्यात मागील एका आठवड्यापासून दररोज 20 हजारहून अधिक कोरोना रुग्ण (Corona Patients) समोर येत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 04 ऑगस्ट : देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) काही प्रमाणात ओसरत असल्याचं चित्र दिसताच तिसऱ्या लाटेची (Third Wave of Covid 19) चर्चा सुरू झाली आहे. तिसरी लाट नेमकी कधी येईल, याबाबतही रिपोर्ट आलेले आहेत. अशात आता मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं, की अजून देशात कोरोनाची दुसरी लाट संपण्याच बराच वेळ लागणार आहे. आरोग्य मंत्रालयानं 8 राज्यांच्या R व्हॅल्यूबाबत (R Value) चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या व्यक्तीनं आपल्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीला संक्रमित केलं तर R व्हॅल्यू 1 असेल, मात्र त्यानंच दोन व्यक्तींना संक्रमित केलं, तर R व्हॅल्यू दोन होईल. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केरळ, तमिळनाडू (Tamil Nadu) , हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि कर्नाटकसारख्या (Karnataka) राज्यांमध्ये R व्हॅल्यू जास्त आहे. विशेषतः केरळमधील स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. राज्यात मागील एका आठवड्यापासून दररोज 20 हजारहून अधिक कोरोना रुग्ण समोर येत आहेत. इतकंच नाही तर संपूर्ण देशभरातील ज्या 44 जिल्ह्याांमध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे, त्यातील 10 जिल्हे केरळमधील आहेत. डेल्टानंतर आता RS विषाणूचा हाहाकार; नवजात बालकं विळख्यात, काय आहेत लक्षणं? मंत्रालयानं म्हटलं, की देशातील 44 जिल्हे असे आहेत जिथे टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्याहून अधिक आहे. यात केरळ, मणिपूर, मिजोराम आणि नागालँडमधील जिल्ह्यांचा समावेश आहे. मागील आठवड्यात संपूर्ण देशभरातून समोर आलेल्या कोरोना रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. एक वर्षानंतर पहिल्यांदाच वुहानमध्ये आढळला कोरोना रुग्ण; सर्व लोकांची होणार चाचणी आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, की जगात सध्या कोरोनाची नवीन प्रकरणे वाढली आहेत. भारताबद्दल बोलायचं झाल्यास, इथे अजून दुसरी लाट संपलेली नाही. गेल्या चार आठवड्यांत 6 राज्यांतील 18 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्र आणि मणिपूर सारख्या राज्यांचा समावेश आहे. मात्र, 10 टक्क्याहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या 44 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्याचा समावेश नाही. मात्र, चिंतेची बाब म्हणजे राज्यातील, अहमदनगर, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात