• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • कोरोनाची लस घेतलेल्या एकाही व्यक्तीचा मृत्यू नाही? वाचा एम्सच्या अभ्यासात काय आलं समोर

कोरोनाची लस घेतलेल्या एकाही व्यक्तीचा मृत्यू नाही? वाचा एम्सच्या अभ्यासात काय आलं समोर

लस घेणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन (Break Through Infection) असं म्हणतात. एम्सनं हा अभ्यास एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान केला.

 • Share this:
  नवी दिल्ली 05 जून : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) ब्रेक थ्रू स्टडीनुसार, कोरोना लसीचा डोस (Corona Vaccine) घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झालेला नाही. लस घेणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन (Breakthrough Infection) असं म्हणतात. एम्सनं हा अभ्यास एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान केला. या काळात कोरोनाची दुसरी लाट शिखरावर होती आणि दररोज जवळपास 4लाख नवे रुग्ण समोर येत होते. एम्सच्या स्टडीनुसार, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, त्यांना कोरोनाची लागण झाली मात्र कोरोनामुळे अशा लोकांना मृत्यू झाला नाही. या अभ्यासात म्हटलं गेलं, की लसीचे डोस घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. एम्सनं ब्रेक थ्रू इन्फेक्शनच्या तब्बल 63 प्रकरणांचा जीनोम सिक्वेंसिंगच्या माध्यमातून अभ्यास केला. यातील 36 रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर, 27 जणांनी एक डोस घेतला होता. यातल्या 10 जणांनी कोविशील्ड लस घेतली होती. तर, 53 जणांनी कोव्हॅक्सिन घेतली होती. यातील कोणत्याही रुग्णाचा कोरोनाबाधित होऊनही मृत्यू झाला नाही. EXPLAINER : पुण्यात कोरोनाची दुसरी लाट नेमकी कशी आटोक्यात आली? या स्टडीनुसार, दिल्लीतील कोरोना संसर्गाची बहुतेक प्रकरणं सारखीच आहेत आणि यात B.1.617.2 आणि B.1.17 हे स्ट्रेन मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे, की ब्रेक थ्रू इन्फेक्शनची प्रकरणं याआधीही समोर आली होती. मात्र, बहुतेक प्रकरणांमध्ये संसर्ग अगदीच थोडा होता. कोणत्याच व्यक्तीची तब्येत गंभीर नव्हती आणि कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. US Vaccine : कोव्हॅक्सिन वा स्पुतनिक लस घेतली असेल तर पुन्हा करा लागेल लसीकरण या स्टडीमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींचं साधारण वय 37 वर्ष होतं. सर्वात कमी वयाचा व्यक्ती 21 वर्षाचा होता. तर, सर्वात वृद्ध व्यक्तीचं वय 92 वर्ष होतं. यात 41 पुरुष आणि 22 महिलांचा समावेश होता. कोणत्याही रुग्णाला आधीपासूनच कोणता गंभीर आजार नव्हता. लसीकरणाबाबत अजूनही लोकांमध्ये जागरुकता नाही. मात्र, कोरोनाच्या लशीपासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. क्लिनिकल ट्रायलमध्येही लस सुरक्षित असल्याचं घोषित केलं गेलं आहे. त्यामुळे, कोरोनापासून बचावासाठी लस घेणं अत्यंत आवश्यक आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: