नवी दिल्ली, 4 जून : मार्चपासून अमेरिकेच्या 400 हून अधिक महाविद्यालये आणि विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सेमिस्टरच्या आधी कोविड - 19 लसीकरण करावे, अशी घोषणा केली आहे. पण ज्यांनी भारताच्या स्वदेशी कोव्हॅक्सिन किंवा रशियन-निर्मित स्पुतनिक व्ही ही लस घेतली आहे, त्यांना पुन्हा लसीकरण करण्यास सांगितले जात आहे. या लशींना अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिलेली नाही.
अमेरिकेतील अनेक शिक्षणसंस्थांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. भारतातील मिलोनी दोशी या 25 वर्षीय विद्यार्थिनीनं कोवॅक्सिन लशीचे दोन डोस घेतलेले आहेत. कोलंबिया विद्यापीठातील स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स या अभ्यासक्रमासाठी तिला अमेरिकेला जायचं आहे. मात्र, कोलंबिया विद्यापीठाकडून तिला दुसरी लस घेण्यास सांगण्यात आलं आहे. मिलोनी दोशी ही विद्यार्थिनी आता पुन्हा लस घेतल्यावर आरोग्यावर काय परिणाम होणार याबाबत चिंतेत आहे.
हे ही वाचा-राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट, 289 बाधित रुग्णांचा मृत्यू
कॅम्पस विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपाय प्रस्तावित करीत आहेत. त्यापैकी स्पुतनिक आणि कोवॅक्सिन सारख्या डब्ल्यूएचओद्वारे मान्यता न मिळालेली लस विद्यार्थ्यांनी घेतली तर अधिक क्लिष्ट परिस्थिती होईल. बर्याच महाविद्यालयांच्या नव्या प्रस्तावानुसार विद्यार्थ्यांना पुन्हा लसीकरण करावे लागणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेली लस घ्यावी लागणार
अमेरिकेबाहेर राहून ज्या विद्यार्थ्यांनी जागतिक आरोग्य संघटनेनेने मान्यता न दिलेली लस घेतली असेल त्यांना 28 दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे. अमेरिकेतील एफडीए या संस्थेने मंजुरी दिलेली लस त्या विद्यार्थ्यांना घ्यावी लगाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Education, United States of America