मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Onam नंतर केरळात कोरोनाचा उद्रेक! 24 तासांतच तब्बल 31 हजार रुग्ण, Positivity rate प्रचंड वाढला

Onam नंतर केरळात कोरोनाचा उद्रेक! 24 तासांतच तब्बल 31 हजार रुग्ण, Positivity rate प्रचंड वाढला

केरळमध्ये कोरोनाचं थैमान

केरळमध्ये कोरोनाचं थैमान

ओणमनंतर केरळमध्ये कोरोनाची परिस्थिती भयंकर झाली आहे.

तिरुवनंतपुरम, ऑगस्ट : ऑगस्टच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने राज्य सरकारला येणाऱ्या धोक्याच्या 15 दिवसांबाबत सावध केलं होतं. या 15 दिवसांत छोटीशी चूकही महागात पडले त्यामुळे कोरोना नियम अधिक कठोर करा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्याच 15 दिवसांपैकी एक असलेला दिवस म्हणजे ओणम (Corona cases in kerala after Onam) . ज्या दिवसांनंतर आता केरळची (Coronavirus cases in kerala) परिस्थिती खरंच भयंकर झाली आहे.

सणासुदीचा कालावधी आहे. नुकताच ओणम साजरा झाला. ओणमनंतर केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच केरळध्ये ओणमनंतर कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहे. गेल्या 24 तासांतच 31 हजार  पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर 215 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  सरकारी आकडेवारीनुसार देशातील सर्वाधिक मृत्यू केरळमध्येच होत आहेत. मंगळवारीसुद्धा 24 तासांत 24,296  नव्या प्रकरणांची नोंद झाली होती. केरळमध्ये अशी भीषण परिस्थिती गेले दोन-तीन महिने बिलकुल नव्हती. सर्वात चिंताजनक म्हणजे राज्याचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे टीपीआर आता 19.03 टक्क्यांवर पोहोचला आहे.

हे वाचा - आणखी एका महासाथीचं संकट, कोरोनापेक्षाही भयंकर असणार; तज्ज्ञांनी केलं अलर्ट

सणासुदीच्या काळात गर्दी होते. लोक खरेदीसाठी, सण साजरे करण्यासाठी बाहेर पडतात. ज्यानंतर कोरोनाचा धोका अधिक वाढताना दिसतो आहे. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे केरळ. ज्या केरळने कोरोना महासाथीवर नियंत्रण मिळवत संपूर्ण जगासमोर एक आदर्श ठेवला, त्यात केरळात आता दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती पुन्हा गंभीर होताना दिसत आहे. ओणमनंतर आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्यामुळे जर काळजी घेतली नाही तर महाराष्ट्राचंही केरळ व्हायला वेळ लागणार नाही.

हे वाचा - COVID-19 च्या भयंकर स्थितीवर पाश्चिमात्य माध्यमांनी भारताला धरलं धारेवर, पण..

ओणमनंतर केरळ सर्वात मोठी शिक्षा भोगतो आहे. ती चूक तुम्ही करू नका. केरळकडे पाहून किमान तुम्ही तरी शहाणे व्हा. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आहे. सरकारने निर्बंधही शिथील केले आहेत. त्यामुळे बिनधास्त आणि बेजबाबदारपणे वागू नका. कोरोना नियमांचं उल्लंघन करू नका. सणवार साजरे करा, पण कोरोनाला हातपाय पसरायला बिलकुल देऊ नका.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Kerala