मराठी बातम्या /बातम्या /nagpur /गर्दी टाळण्यासाठी अमरावती पॅटर्न ठरतोय हिट! डब्ब्यात चिठ्ठी टाकून घरी जा, असं होईल Vaccination

गर्दी टाळण्यासाठी अमरावती पॅटर्न ठरतोय हिट! डब्ब्यात चिठ्ठी टाकून घरी जा, असं होईल Vaccination

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना लसीकरणासाठी (Corona vaccination) होणारी गर्दी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. पण अमरावतील अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाने गर्दी टाळण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीचा प्रश्न सुटला आहे.

पुढे वाचा ...

अमरावती, 01 मे: कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona 2nd wave) आल्यापासून राज्यासह देशात कोरोना बाधित रुग्णांचा (Corona Patients) आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता, आरोग्य प्रशासनानं कडक नियमांसोबतचं लसीकरणावर भर द्यायला सुरुवात केली आहे. अशात एकिकडे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना लसीकरणासाठी (Corona vaccination) होणारी गर्दी डोकेदुखी ठरत आहे. पण अमरावतील अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाने गर्दी टाळण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीचा प्रश्न सुटला आहे.

लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी रुग्णालयात टोकन पद्धतीचा अवलंब केला आहे. या रुग्णालयासमोर एक डब्बा ठेवण्यात आला आहे. रुग्णालयात लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना नाव, वय, मोबाइल नंबर आणि कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन याबाबतची माहिती चिठ्ठीवर लिहून संबंधित डब्यात टाकून घरी पाठवलं जात आहे. त्यानंतर लशीच्या उपलब्धतेनुसार नागरीकांना फोन करून बोलावलं जातं आहे. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचा हा अनोखा टोकन उपक्रम जिल्ह्यात हीट ठरत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीचा प्रश्न पूर्णपणे मिटला आहे.

हे वाचा-ऑस्ट्रेलिया-US मध्ये भारतातून प्रवासावर BAN! 15 हून अधिक देशांत कठोर निर्बंध

राज्यात कोरोना संसर्ग झपाट्यानं वाढत असताना, लसीकरणासाठी आलेले लोकं रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी करत होते. दरम्यान अनेक तास त्यांना रांगेत उभं राहावं लागत होतं. त्यामुळे नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत होता, तसेच लशीसाठी रांगेत उभं राहिल्यानं वेळही वाया जात होता. पण अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाने टोकन पद्धतीचा अवलंब करत सर्व प्रश्न निकाली काढले आहे. तसेच लोकांना घाई गडबड न करता लस घेता येऊ लागली आहे.

हे वाचा-Positive News : हृदयात गंभीर बिघाड असलेल्या 2 महिन्याच्या बालकाने कोरोनाला हरवलं

गुरुवारी जवळपास 500 ते 600 नागरीकांनी आपला तपशील लिहून संबंधित चिठ्ठी डब्यात टाकली आहे. त्यामुळे रुग्णालयात लसीकरणासाठी होणारी गर्दी नगण्य झाली आहे. लसीकरणाचा हा अमरावती पॅटर्न इतरत्रही राबवल्यास बरेच प्रश्न सुटू शकतात.

First published:
top videos

    Tags: Amravati, Corona vaccine