मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनानंतर आता नवं संकट! Bone Death ची प्रकरणं वाढणार; मोदी सरकारने केलं सावध

कोरोनानंतर आता नवं संकट! Bone Death ची प्रकरणं वाढणार; मोदी सरकारने केलं सावध

मुंबईत कोरोनानंतर बोन डेथ (Bone Death) झाल्याचे तीन रुग्ण सापडले आहेत.

मुंबईत कोरोनानंतर बोन डेथ (Bone Death) झाल्याचे तीन रुग्ण सापडले आहेत.

मुंबईत कोरोनानंतर बोन डेथ (Bone Death) झाल्याचे तीन रुग्ण सापडले आहेत.

मुंबई, 06 जुलै: एकिकडे कोरोनातून (Coronavirus) जास्तीत जास्त रुग्ण बरे होत असल्याचा दिलासा आहे. पण तरी टेन्शन काही गेलेलं नाही. कारण कोरोनानंतर (Post covid comlpilcation) नवनवीन आजार आव्हान बनून उभी राहिली आहेत. याआधी म्युकरमायकोसिस आणि आता बोन डेथचं (Bone death) संकट आहे. कोरोनानंतर बोन डेथचा धोका असून याची प्रकरणं वाढू शकतात, असा इशारा मोदी सरकारने दिला आहे.

बोन डेथ ज्याला वैद्यकीय भाषेत अव्हॅस्कुलर नेक्रॉसिस किंवा डेथ ऑफ बोन टिश्युज (Avascular Necrosis or Death of Bone Tissues) म्हटलं जातं. मुंबईतील 40 वर्षांहून कमी वय असलेल्या तीन रुग्णांमध्ये ही समस्या  दिसून आली आहे. कोविडवरील उपचार घेतल्यानंतर 2 महिन्यांनी अव्हॅस्कुलर नेक्रॉसिसची लक्षणं दिसलेल्या 40 वर्षांखालील 3 रुग्णांवर माहिममधील हिंदुजा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उपचार केले आहेत.

मुंबईतील या प्रकरणांबाबत आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितलं की, कोरोनामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. त्यामुळे या रुग्णांना ब्लड थिनर म्हणजे रक्त पातळ करणारी औषधं दिली जातात. त्यामुळे बोन डेथची शक्यता वाढते. अशी प्रकरणं समोर येऊ शकतात.

हे वाचा - कोरोनामुक्त महिलेला बळावली अशी समस्या; पाहून डॉक्टरही झाले हैराण

माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आणि ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. संजय अग्रवाल यांचा ‘अव्हॅस्कुलर नेक्रॉसिस अज ए पार्ट ऑफ लाँग कोविड-19 (Avascular necrosis as a part of long covid-19)’ हा रिसर्च पेपर प्रतिष्ठित मेडिकल जर्नल ‘BMJ Case Studies’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.  अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस स्पेशलिस्ट असणाऱ्या डॉ. अग्रवाल यांनी यावर बायस्फोसफोनेट रिजिम नावाची एक मेडिकल ट्रिटमेंट विकसित केली आहे. जी गेल्या 20 वर्षांपासून जगभरात एव्हीएनच्या रुग्णांना उपचार देण्यासाठी वापरली जाते.

त्यांच्या अभ्यासानुसार कोविड होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये दोन ट्रेंड दिसून येत आहेत जे खरोखर चिंताजनक आहेत. एक म्हणजे कोविड झालेला असताना पेशंटना corticosteroid prednisolone या स्टिरॉइडचा 758mg चा डोस दिला गेला. हाच डोस 2000mg इतका दिला गेला तर शरीरात एव्हीएनची समस्या निर्माण होऊ शकते. इतक्या कमी डोसमध्ये एव्हीएनची लक्षणं दिसणं ही एक चिंतेची बाब आहे. दुसरी चिंतेची बाब म्हणजे साधारणपणे स्टिरॉइड्स घेतल्यानंतर सहा महिने ते एका वर्षात एव्हीनए विकसित होतो पण तो कोविड पेशंटमध्ये लवकर विकसित होताना दिसतो आहे.

हे वाचा - Alert! ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठं संकट; SBI चा धक्कादायक रिपोर्ट

डॉ. अग्रवाल म्हणाले, ‘सहसा एव्हीन विकसित व्हायला इतका वेळ लागत असताना आमच्या पेशंट्समध्ये मात्र निदानानंतर 58 दिवसांत ही लक्षणं दिसून आली आहेत. कोविड-19 झालेला असताना स्टिरॉइड्स दिले गेलेल्या रुग्णांना खुब्यात किंवा मांडीत दुखणं जाणवत असेल तर त्यांनी MRI करून घ्यावा आणि त्यांना हिपचा एव्हीएन झाला नाही ना हे तपासून घ्यावं. त्यांनी जर लवकर बायस्फोस्फोनेट थेरेपी सुरू केली तर त्यांचा हा आजार लवकर बरा होऊ शकतो. सामान्यपणे एव्हीएन झाल्यावर सर्जरी करावी लागते पण आता ज्या पेशंटना त्याची लक्षणं दिसली त्यांनी तातडीने उपचार घेतल्यामुळे त्यांना ही सर्जरी करण्याची गरज पडलेली नाही.

केव्हा होतो एव्हीएन

- जेव्हा हाडांना होणारा रक्तपुरवठा तात्पुरता किंवा कायमचा थांबतो तेव्हा एव्हीएन विकसित होतो. हाडांना रुक्तपुरवठा न झाल्याने हाडातील टिश्यु मरण पावतात.

- सांध्यांनाही याचा फटका बसू शकतो.

- दीर्घकाळ corticosteroid किंवा अल्कोहोलचं सेवन, हाडांना दुखापत होणं, हाडं फ्रॅक्चर होणं किंवा ब्लड व्हेसल्सना दुखापत होणं यामुळेही AVN होऊ शकतो.

- प्रमुख लक्षण म्हणजे सांधे दुखणं आणि हालाचाली मर्यादित होणं.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid-19, India