नवी दिल्ली, 06 जुलै: आधी कोरोनाची (Coronavirus) प्रकरणं वाढली म्हणून चिंता आणि त्यानंतर हे रुग्ण कोरोनामुक्त (Covid-19) झाले तरी चिंता कायमच आहे आणि याचं कारण म्हणजे पोस्ट कोविड गुंतागुंत (Post Covid Complication). कोरोनातून बरं झाल्यानंतरही अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. महत्त्वाचं म्हणजे कोरोना फक्त फुफ्फुस नाही तर इतर अवयवांवरही गंभीर परिणाम करतो आहे. अगदी हेल्दी अवयवांमध्येही समस्या बळावत आहे. नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं आहे.
एका 48 वर्षांच्या महिलेला कोरोनातून बरं झाल्यानंतर पित्ताशयाला (Gallbladder) सूज आली आहे. ही समस्या पाहून डॉक्टरही हैराण झाले. पित्ताशयात खडे झाल्यास अशी सूज येते. यामुळे पित्ताशयातून आतड्यांपर्यंत जाणारी वाहिनी बंद होते.
हे वाचा - या लोकांना डेल्टा व्हेरियंटचा सर्वाधिक धोका; लसीच्या प्रभावाबाबत मोठा खुलासा
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिल्लीच्या मूलचंद मेडसिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितलं, या महिलेला खडे नव्हते. तसंच तिला पित्ताशयासंबंधी कोणताही आजार नव्हता. कोरोनाशी लढा दिल्यानंतर आरोग्यासंबंधी उद्भवलेली ही पहिली समस्या नाही. याआधी काही रुग्णांना गँगरिनही झाला आहे.
हे वाचा - पुढच्या महिन्यात धडकणार कोरोनाची तिसरी लाट; कसा कराल स्वतःचा बचाव?
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांच्या रक्तातील साखऱेची पातळीही झपाट्याने वाढत असल्याचं दिसून आलं आहे. पाटणा एम्समध्ये कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात अनेकलोक शुगर लेव्हल वाढणं, थकवा, डोकेदुखी अशा अनेक समस्यांना सामोरं जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Covid-19, Health, Lifestyle, Wellness