ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असा रिपोर्ट एसबीआयने जारी केला आहे. सप्टेंबरमध्ये ही लाट सर्वोच्च शिखर गाठेल.
कोरोना लस आणि कोरोना नियमांचं पालन या दोन मार्गांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखता येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याआधी सांगितलं आहे.
कोरोनाविरोधात सध्या आपल्या हातात असलेलं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे मास्क. त्यामुळे घराबाहेर पडताना चेहऱ्यावरील मास्क बिलकुल हटवू नका.
पृष्ठभागाला स्पर्श केल्यानेही कोरोनाचा धोका आहे, त्यामुळे सर्वांचे हात वारंवार लागू शकतात, अशा ठिकाणी हात लागल्यानंतर हात नीट स्वच्छ करा. यासाठी साबण आणि पाण्याचा वापर करा. ते शक्य नसेल तर हँड सॅनिटायझर वापरा.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना लस घ्या. यामुळे कोरोना झाला तरी त्याची तीव्रता आणि त्यामुळे असणारा मृत्यूचा धोकाही कमी होतो, हे संशोधनातून समोर आलं आहे.
एकंदरीतच काय तर कोरोना वारंवार आपली रूपं बदलतो आहे, त्याच्याबाबत अद्यापही संशोधन सुरू आहे. पण त्याला रोखण्यासाठी आतापर्यंत जे उपाय करण्यात आले त्याची अंमलबजावणी आपण कायम करायला हवी.