Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनानं पुन्हा काढलं डोकं वर? 53 देशांनी वाढवली चिंता, नव्या लाटेची शक्यता

कोरोनानं पुन्हा काढलं डोकं वर? 53 देशांनी वाढवली चिंता, नव्या लाटेची शक्यता

विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय योग्य पद्धतीनं न केल्यानं आणि काही भागात लसीकरणाचा कमी दर, हे सांगून जातो की कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ का होत आहे.

    नवी दिल्ली 05 नोव्हेंबर : युरोप आणि मध्य आशियातील 53 देशांमध्ये कोरोना विषाणूच्या (Coronavirus) आणखी एका लाटेचा धोका (New Wave of Coronavirus) आहे किंवा यातील बरेच देश आधीच महामारीच्या नवीन लाटेचा सामना करत आहेत. गुरुवारी ही माहिती देताना, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख डॉ. हॅन्स क्लुज म्हणाले की, रुग्णांची संख्या पुन्हा विक्रमी पातळीवर वाढू लागली आहे. या भागांत कोरोना प्रसाराचा वेग (Corona Cases Increases) ही बाब गंभीर चिंतेचा विषय आहे. Corona Vaccination: पुण्यापाठोपाठ मुंबईतही आजपासून 4 दिवस लसीकरण बंद राहणार डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील संघटनेच्या युरोप मुख्यालयात त्यांनी पत्रकारांना सांगितले की, 'आपण महामारीच्या उद्रेकाच्या एका गंभीर टप्प्यावर उभे आहोत.' "युरोप पुन्हा एकदा साथीच्या रोगाच्या केंद्रस्थानी आहे, जिथे आपण एक वर्षापूर्वी होतो," डॉ क्लुज म्हणाले की फरक हा आहे की यावेळी आरोग्य अधिकार्‍यांना व्हायरसबद्दल अधिक माहिती आहे आणि महामारीसोबत लढण्यासाठी चांगली साधने उपलब्ध आहेत. ते म्हणाले की विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय योग्य पद्धतीनं न केल्यानं आणि काही भागात लसीकरणाचा कमी दर, हे सांगून जातो की कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ का होत आहे.. डॉ क्लुज म्हणाले की, गेल्या एका आठवड्यात 53 देशांमध्ये कोविडमुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. मोठी बातमी ! 'लसीकरण नाही तर पगार नाही अन् कार्यालयातही प्रवेश बंदी' ते म्हणाले की, हीच परिस्थिती कायम राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत या देशांमध्ये साथीच्या आजारामुळे आणखी पाच लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. संघटनेच्या युरोप कार्यालयाने सांगितले, की या प्रदेशात आठवडाभरात 18 लाख नवीन प्रकरणं समोर आली आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत यात सहा टक्के वाढ झाली आहे तर आठवडाभरात 24,000 रुग्णांचे मृत्यू झाले असून मृतांच्या संख्ते12 टक्के वाढ झाली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Corona vaccine, Coronavirus cases

    पुढील बातम्या