मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

मोठी बातमी ! 'लसीकरण नाही तर पगार नाही अन् कार्यालयातही प्रवेश बंदी' नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व सरकारी कार्यालयांना निर्देश

मोठी बातमी ! 'लसीकरण नाही तर पगार नाही अन् कार्यालयातही प्रवेश बंदी' नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व सरकारी कार्यालयांना निर्देश

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

No Vaccination No Salary: कोरोना विरुद्धच्या लढाईत कोविड प्रतिबंधक लस ही महत्त्वाची ढाल आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसल्यास पगारही मिळणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

नागपूर, 4 नोव्हेंबर : कोरोना विरुद्ध लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी प्रशासनाने हळूहळू कठोरता आणत दोन डोस घेणे, अनिवार्य केले आहे. दोन डोस (Covid vaccine) न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे स्पष्ट निर्देश नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आलेत. विभाग प्रमुखांना याची खातरजमा करून अहवाल सादर करावा. 30 नोव्हेंबर पूर्वी संपूर्ण जिल्ह्यात किमान पहिल्या डोसचे 100% लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश, आज जिल्हाधिकारी विमला आर. (Nagpur Collector Vimala R) यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये या संदर्भात केंद्र-राज्य शासकीय-निमशासकीय सर्व आस्थापनांच्या विभाग प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन या सूचना देण्यात आल्या. (No vaccination No salary in Nagpur)

कॉलेजमध्ये प्रवेश, विद्यार्थ्यांची उपस्थिती, कॉलेज उपक्रमातील सहभाग, यासाठी विद्यार्थ्यांनाही लसीकरणाची सक्ती प्रशासनाने करावी. वेगवेगळ्या उद्योग समूहात काम करणाऱ्या कामगारांना कामावर घेताना, मजुरांना काम देताना प्रत्येकाचे दोन डोस झाले आहे, याची खातरजमा करणे गरजेचे आहे. जनतेशी संपर्क येणाऱ्या प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण 100% झालेच पाहिजे. जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत पहिला डोस शंभर टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट घेण्यात यावे, यामध्ये कोणताही कसूर राहता कामा नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लसीकरण नसेल तर... पगार नाही, कोणत्या शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयात प्रवेश नाही !

सवलत, लाभ, योजना, सहभागासाठी लसीकरण अनिवार्य

जिल्हाधिकारी आर विमल यांचे नागपुरातील राज्य, निमशासकीय कार्यालयांना निर्देश

30 नोव्हेंबरच्या आत 100 टक्के उद्दीष्ठ पूर्ण करा

कोरोना विरुद्ध लढ्यात लसीकरण आवश्यक

कर्मचाऱ्यांना डोस पूर्ण केल्याशिवाय वेतन नाही

कॉलेज प्रवेश, परीक्षा,सहभागासाठी अनिवार्यता

मिशन मोडवर काम करण्याचे यंत्रणेला निर्देश

वाचा : दिवाळीच्या पहिल्या दिवशी Good News, 'या' सिंगल लसीचा डोस करतोय Coronaचा धोबीपछाड

राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरण करा - मुख्यमंत्री

विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

कोरोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

आपआपल्या जिल्ह्यात 100 % लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व स्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सूचनाही केल्या.

वाचा : भारताला दिवाळी गिफ्ट! Covaxin ला जागतिक आरोग्य संघटनेची अखेर मंजुरी

नागरिकांनी बेफिकीर होऊ नये - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, सुरवातीला कोविडची भीती होती. पण आता कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी चाचणीचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी आपण प्रयोगशाळा विकसित केल्या. त्याचा वापर करायला हवा.

कोविडचे संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करुन द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्तन ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाईल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी असे सांगितले.

First published:

Tags: Coronavirus, Government employees, Nagpur, Vaccination