जालना 14 ऑगस्ट : राज्यात कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Coronavirus) काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये निर्बंध काही प्रमाणात आणि नियम व अटीनुसार शिथील करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळत असतानाच आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांची (Maharashtra delta plus cases) संख्या वाढत आहे. राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांचा आकडा 66 वर पोहोचला आहे.
आता नाकातून घेता येणार लस! Nasal Vaccine च्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी
आणखी एक चिंता वाढवणारी बाब म्हणजे यातील 18 रुग्णांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मात्र, लस घेऊनही त्यांना कोरोनाच्या या घातक व्हेरिएंटची लागण झाली आहे. जालन्यात बोलताना राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे आरोग्य विभागासह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र, काळजी करण्याची गरज नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोना महासाथीत जन्मलेल्या बालकांबाबत धक्कादायक माहिती आली समोर
आरोग्यमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितलं, की राज्यात डेल्टा व्हेरिएंटचे सध्या 80 टक्के रुग्ण आहेत. तर काही रुग्ण डेल्टा प्लसचे आहेत. डेल्टा प्लससंदर्भात सध्या उपाययोजन करत असून अशा रुग्णांची माहिती घेऊन त्यांची पार्श्वभूमी आम्ही जाणून घेत आहोत. यासोबतच अशा रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य उपचार देत आहोत. सोबत त्यांनी हेदेखील सांगितलं, की यातील 18 रुग्ण असे आहेत ज्यांना लसीचे दोन्ही डोस घेऊनही डेल्टा प्लसची लागण झाली आहे. यासोबतच राज्यात जे पाच मृत्यू झाले आहेत, ते डेल्टा प्लसचे नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इतर व्याधी आणि वय जास्त असल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Coronavirus