जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / GOOD NEWS : राज्यातील कोरोनाचा पहिला हॉटस्पॉट; पुण्यातील या भागात आज एकही नवा रुग्ण नाही!

GOOD NEWS : राज्यातील कोरोनाचा पहिला हॉटस्पॉट; पुण्यातील या भागात आज एकही नवा रुग्ण नाही!

GOOD NEWS : राज्यातील कोरोनाचा पहिला हॉटस्पॉट; पुण्यातील या भागात आज एकही नवा रुग्ण नाही!

पुण्यातील हा भाग राज्यातील पहिला हॉटस्पॉट ठरला होता. आता मात्र येथून चांगली बातमी समोर आली आहे. यावरुन कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसून येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 14 जून : एकीकडे मुंबईतील धारावी कोरोना मुक्त होत असतानाच इकडे पुण्यातील भवानी पेठदेखील पहिल्यांदाच कोरोना मुक्त झाली आहे. आज तिथं एकही नवीन कोरोना रूग्ण आढळून आलेला नाही. विशेष म्हणजे राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण 9 मार्च 2020 रोजी आढळून आल्यानंतर राज्यातला पुणेअंतर्गत (Pune) भवानी पेठ हा पहिलाच कोरोना हॉटस्पॉट म्हणून समोर आला होता. पहिल्या लाटेत भवानी पेठेतील कोरोनाची साथ आटोक्यात आणायला तब्बल सहा महिने लागले होते. त्यानंतर ढोलेपाटील रोड, बिबवेवाडी, हडपसर, येरवडा, सिंहगड रोड असे एका पाठोपाठ नवनवे हॉटस्पॉट वाढतच गेले. (Coronas first hotspot in the state there is no new patient today ) दुसऱ्या लाटेत मात्र पहिल्यापासून भवानी पेठ या पूर्वीश्रमीच्या हॉटस्पॉटमध्ये कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात होता आणि आज तर थेट तिथं चक्क शून्य रूग्णवाढ नोंदवली गेली आहे. त्यापाठोपाठ बिबवेवाडीतही आज अवघे 2 रूग्ण आढळून आले आहेत. ही नक्कीच समाधानाची बाब म्हणावी लागेल. कारण हे दोन्ही परिसर बऱ्यापैकी दाट लोकवस्तीचे आहेत. म्हणूनच कदाचित पहिल्या लाटेत भवानीपेठेत मोठी मनुष्यहानी झाली होती. भवानीपेठेच्या तुलनेत हडपसर, नगररोड, सिंहगड रोड, धनकवडी भागात माञ अजूनही दररोज सरासरी वीस-पंचवीस नवे रूग्ण आढळून येतच आहेत. दरम्यान आज पुणे शहरात दिवसभरात अवघ्या 187 कोरोनाबधित रुग्णांची नोंद झाली आहे. हे ही वाचा- पुण्यात आजपासून नवीन नियामवली, काय सुरू, काय राहणार बंद? दुसऱ्या लाटेतील ही निच्चांकी रूग्णवाढ ठरली आहे. तसंच पॉजिटिव्ही रेट देखील 4 टक्क्यांवर घसरला आहे. त्यामुळे किमान पुणे शहरात तरी कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे आटोक्यात आल्याचं चित्र दिसत आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये आज अवघे 158 रूग्ण नोंदवले गेलेत. याउलट पुणे ग्रामीण भागातील दैनंदिन रूग्णसंख्या मात्र अजूनही पाचशेच्या वर म्हणजेच पुणे शहराच्या दुप्पट आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला आता ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. तसंच इकडे पुणेकरांनीही कोरोना संपल्याच्या थाटात अकारण गर्दी करू नये, असं आवाहन पुणे मनपाने केलंय… पुणे कोरोना अपडेट 14  जून 2021 - दिवसभरात 187 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ३१९ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात कोरोनाबाधीत 13 रुग्णांचा मृत्यू,  पुण्याबाहेरील ०6. - ५०२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७४२९९. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २८८८. - एकूण मृत्यू -८४८२. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६२९२९. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३४४१.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात