Home /News /career /

MH BOARD 12TH RESULT: नेहमी बोर्डाच्या निकालात मुलीच का ठरतात अव्वल? मुलं कुठे पडतात कमी? मिळेल उत्तर

MH BOARD 12TH RESULT: नेहमी बोर्डाच्या निकालात मुलीच का ठरतात अव्वल? मुलं कुठे पडतात कमी? मिळेल उत्तर

बोर्डाच्या परीक्षेत (Board exams) मुली नेहमीच मुलांपेक्षा अव्वल का ठरतात? याचा विचार तुम्ही कधी केला आहे? नाही ना. मग आज आम्ही याच उत्तर तुम्हाला देणार आहोत.

    मुंबई, 08 जून:  बोर्डाचा निकाल म्हंटलं की अनेकांची नजर असते ती म्हणजे परिचयातील विद्यार्थ्यांवर आणि एकूण निकालाच्या टक्केवारीवर. मात्र दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेत एक वाक्य बदलत नाही आणि ते म्हणजे 'यंदा मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी जास्त (why girls top exams) आहे'. मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा नेहमीच अव्वल असतो. पण असं का? बोर्डाच्या परीक्षेत (Board exams) मुली नेहमीच मुलांपेक्षा अव्वल का ठरतात? याचा विचार तुम्ही कधी केला आहे? नाही ना. मग आज आम्ही याच उत्तर तुम्हाला देणार आहोत. बोर्डाची परीक्षा म्हंटलं की मुलं-मुली सर्वच विद्यार्थ्यांना टेन्शन येतं. त्यात कुटूंबातील प्रत्येक व्यक्ती यंदा बोर्डाची परीक्षा आहे म्हणून विद्यार्थ्यांना सतत आठवण करू देत असते. शाळेतून आणि जुनिअर कॉलेजमधूनही ताण असतो. तरीही या सर्वातून मुली मार्ग काढत समोर जातात आणि अव्वल ठरतात. असं नेमकं कशामुळे होतं? यासाठी Organisation for Economic Co-operation and Development या संस्थेनं एक अभ्यास केला. या अभयसातून जे समोर आलं ते खरंच अषाचार्यचकित करणारं होतं. MH BOARD 12TH RESULT: बारावीचे पेपर्स Re-checking ला द्यायचे आहेत? मग किती लागेल फी? जाणून घ्या या संस्थेनं 15 वर्षांच्या मुला-मुलींच्या कामगिरीची गणित आणि विज्ञानासह विविध विषयांमध्ये तपासणी केली. असं दिसून आलं की गणित आणि विज्ञान शाखेत मुलं मुलींपेक्षा हुशार आहेत, परंतु एकूण निकाल मुलींच्या बाजूनं आहे. अभ्यासात असंही दिसून आलं की मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात मुलींपेक्षा जास्त संघर्ष केला आहे. या क्षेत्रांमध्ये ते मूलभूत मानकांपेक्षा कमी पडण्याची शक्यता 50 टक्के जास्त आहे. यानंतर विविध निकषांचा अभ्यास केल्यानंतर मुली मुलांपेक्षा का अवलं आहेत हे लक्षात आलं आहे. ...म्हणून आहेत मुली अव्वल मुली करतात अधिक वाचन एका सर्वेक्षणानुसार, मुलींमध्ये वाचनाची (Reading ability) आवड जास्त असते तर अनेक मुलांना वाचायला अजिबात आवडत नाही. म्हणूनच मुलांपेक्षा मुलींना ज्ञान कमी असते. तसंच या सर्वेक्षणानुसार, अर्ध्यापेक्षा अधिक मुली दिवसभरातुन किमान अर्धा तास वाचन करतात. याउलट एक तृतीयांशपेक्षा कमी मुलं इतका वेळ वाचन करतात. मुलींचा अटेन्शन स्पॅन चांगला कॅनडातील न्यू ब्रंसविक विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॅनियल व्हॉयर आणि सुसान व्हॉयर यांनी अनेक भिन्न प्रकाशित अभ्यासांतील डेटा एकत्र करून मेटा-विश्लेषणकेलंय त्यात असं म्हंटलं आहे की, मुली शाळेतील वर्गांमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं लक्ष केंद्रित (Good Attention span) करू शकतात म्हणूनच त्या अभ्यासात आणि परीक्षेत अव्वल येतात. तर याउलट मुलं अधिक लक्ष केंद्रित करू शकत नाहीत म्हणून परीक्षेत कमी पडतात. MH BOARD 12TH RESULT LIVE: अपेक्षेपेक्षा मार्क्स कमी वाटताहेत? पुनर्मूल्यांकनासाठी असे करा अर्ज वाईट सवयी आणि ताण संशोधकांना असंही आढळलं की मुलं त्यांचा मोकळा वेळ आभासी जगात घालवतात. ते दररोज मुलींच्या तुलने ऑनलाइन गेम खेळण्याची 17 टक्के अधिक शक्यता असते. ते इंटरनेटचा जास्त वापर करतात. तसंच त्यांना कुटूंबीयांकडून प्रोत्साहनही कमी मिळतं. याउलट मुली कुटुंबियांसह अधिक वेळ घालवतात. मुलींना कमी गुण मिळाले तर कुटूंबीयांकडून त्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. एकूणच मुली या गोष्टीमुळे अव्वल असतात असं शास्त्रज्ञ म्हणतात. या बातमीतून मुलं किंवा मुली असा भेदभाव करण्याचा अजिबात हेतू नाही. मात्र योग्य तो अभ्यास केला आणि आपल्या पात्रतेनुसार अभयास केला तर कोणीही कुठेही कमी नाही.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Career, Exam Fever 2022, Exam result, HSC

    पुढील बातम्या