MH BOARD 12TH RESULT LIVE: अपेक्षेपेक्षा मार्क्स कमी वाटताहेत? पुनर्मूल्यांकनासाठी असे करा अर्ज

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12वी निकाल: इथे मिळतील निकालासंदर्भातील LIVE Updates

 • News18 Lokmat
 • | June 08, 2022, 13:38 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  14:23 (IST)

  12th Result Live: मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला 

  "आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे.  काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता  पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना अभिनंदन देत म्हंटल आहे. 

  13:26 (IST)

  #HSCResult2022:  राज्याच्या एकूण निकाल 94.22%

  13:25 (IST)

  महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे.

  बोर्डाच्या वेबसाइटबरोबरच तो lokmat.news18.com वरही दिसू शकेल.

   

  13:24 (IST)
  13:10 (IST)
  12:49 (IST)

  सायन्सचे विद्यार्थी हुश्शार.... आर्टस् थोडं मागे 

  सायन्स - 98.30%
  आर्टस् - 90.52%
  कॉमर्स - 91.71%
  आयटीआय - 66.41 %
  व्यावसायिक अभ्यासक्रम - 92.40%

  12:23 (IST)

  धक-धक करने लगा.....

  निकालाची वेळ जशी जशी जवळ उयेतेय तशी विद्यार्थ्यांच्या मनात आणि पालकांच्या मनात धाकधूक वाढू लागली आहे. आपला निकाल चांगला येईल का? चांगले मार्क्स मिळतील का या भीतीनं विद्दयार्थ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. मात्र टेन्शसने घेऊ नका. निकाल बघताना कोणतीही गडबड करू नका. शांतपणे तुमचा रोल नंबर भर आणि तुमचा निकाल बघा.    

  मुंबई, 08 जून: गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 08 जुन 2022 ला स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे. निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास उरले आहे. आज दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.