Home /News /career /

MH BOARD 12TH RESULT: बारावीचे पेपर्स Re-checking ला द्यायचे आहेत? मग किती लागेल फी? जाणून घ्या

MH BOARD 12TH RESULT: बारावीचे पेपर्स Re-checking ला द्यायचे आहेत? मग किती लागेल फी? जाणून घ्या

अशी असेल रिचेकिंग प्रोसेस

अशी असेल रिचेकिंग प्रोसेस

ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पुनर्मूल्यांकनासाठी द्यायचा असेल त्यांच्यासाठी यंदाही विशेष सोय करण्यात आली आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

  मुंबई, 08 जून:  यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं होतं. मात्र आता निकाल अखेर जाहीर झाला आहे. तुम्ही आता तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं News18lokmat.com वेबसाईटवर बघू शकणार आहात. बरेचदा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स बरेच कमी दिसतात. पेपर चांगले सोडवल्यानंतरही चांगले मार्क्स मिळू शकत नाहीत. यामुळे गुणांमध्येहे फरक पडतो. विद्यार्थ्यांचू निराशा होते. म्हणूनच निकालानंतर पुनर्मूल्यांकनाची व्यव्यस्था करण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पुनर्मूल्यांकनासाठी द्यायचा असेल त्यांच्यासाठी यंदाही विशेष सोय करण्यात आली आहे.
  विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी बोर्डाकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर येत्या 10 जूनपासून अर्ज करता येणार आहे. तसंच पेपर रिचेकिंग देण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्कही भरावं लागणार आहे. अशी असेल रिचेकिंग प्रोसेस पेपर रिचेकिंगला देण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना आधी verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे. यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगसाठी त्यांचे अर्ज करायचे आहेत. यानंतर विवद्यार्थ्यांचे पेपर्स गुण मूल्यांकनाला जाणार आहेत. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायाप्रत मिळणार आहेत. यानंतरही पेपरमध्ये काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सना रिचेकिंग ला देता येणार आहे. MH BOARD 12TH RESULT LIVE: अपेक्षेपेक्षा मार्क्स कमी वाटताहेत? पुनर्मूल्यांकनासाठी असे करा अर्ज रिचेकिंग साठी किती असेल शुल्क विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायाप्रत मिळवण्यासाठी चारशे रुपये शुल्क भराव लागणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फक्त गन पडताळणी करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी तीनशे रुपये शुल्क असणार आहे. काही महत्त्वाच्या तारखा 10 जून ते 20 जून - पेपर्स रिचेकिंगला देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 10 जून ते 29 जून - तुमच्या उत्तपत्रिकेच्या प्रिंटसाठी अर्ज करण्यासाठीचा कालावधी. 10 जून - पुरवणी परीक्षेसाठी अर्ज सुरु होण्याची तारीख. 17 जून - विद्यार्थ्यांना दुपारी तीन वाजतापासून मार्कशीट मिळणार.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Exam Fever 2022, Exam result, HSC

  पुढील बातम्या