मराठी बातम्या /बातम्या /करिअर /आईच्या एका सल्ल्यानं बदललं आयुष्य, UPSC मध्ये 4 वेळा अपयशानंतर झाला IPS

आईच्या एका सल्ल्यानं बदललं आयुष्य, UPSC मध्ये 4 वेळा अपयशानंतर झाला IPS

17 दिवसांत तयारी करून देशात 55 वा क्रमांक मिळवणाऱ्या हरहुन्नरी अधिकाऱ्याची यशोगाथा

17 दिवसांत तयारी करून देशात 55 वा क्रमांक मिळवणाऱ्या हरहुन्नरी अधिकाऱ्याची यशोगाथा

17 दिवसांत तयारी करून देशात 55 वा क्रमांक मिळवणाऱ्या हरहुन्नरी अधिकाऱ्याची यशोगाथा

नवी दिल्ली, 19 एप्रिल : प्रत्येक ग्रूपमध्ये असा एक मुलगा असतो ज्याला सरकारी अधिकारी व्हाययचं असतं. सरकारी अधिकाऱ्याची प्रतिष्ठा , हक्क अधिकार आणि रुबाब या सगळ्याच गोष्टी अनेक मुलांना खुणावत असतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येन मुलं UPSC परीक्षा देतात. त्यातून बोटावर मोजण्याएवढ्याच मुलांना यश मिळतं. ही परीक्षा कठीण असते जिद्द, चिकाटी, सकारात्मकता आणि सर्व अंगानं कस लावणारी असल्यानं प्रत्येक टप्प्यावर चाऴणी लावण्यात येते. ताऊन सुलाखून शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणारे उमेदवार फार कमी असतात. काही पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतात, काहींना अधिक प्रयत्न करावा लागतो. चार वेळा अपयश आलं आणि अखेर पाचव्यांदा परीक्षेत यश मिळवणाऱ्या अशाच एक हरहुन्नरी उमेदवाराच्या संघर्षाची ही कहाणी आहे.

हे वाचा-कोरोनाचा हॉटस्पॉट: रिपोर्ट येण्यापूर्वीच मालेगावात 35 वर्षांचा तरुणाचा मृत्यू

अक्षत कौशल यांनी 2012 पासून चार वेळा UPSC परीक्षा दिली. प्रत्येक वेळी मात्र पदरात अपयश आलं. त्यामुळे खूप निराश झाले होते. सरकारी अधिकारी होणं हे आपल्या नशिबातच नाही असं त्यांना वाटत होतं. पण पाचव्या प्रयत्नात काय घडले याचा अंदाजदेखील त्यांना नव्हता. 17 दिवस तयारी करून त्यांना  पाचव्यांदा परीक्षेत यश मिळालं आहे. या परीक्षेसाठी सर्वप्रथम संयम आवश्यक आहे, असा अक्षत यांचं म्हणणं आहे.

ह्या परीक्षेसाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली होती. याआधी चारवेळा परीक्षेत अपयश मिळाल्यानं पुन्हा परीक्षा न देता छोटी नोकरी करून उदरनिर्वाह करण्याचा विचार त्यांनी केला. मात्र त्यांच्या आई-वडिलांनी पुन्हा पाचव्यांदा परीक्षा द्यावी असा हट्ट केला होता. आई-वडिलांसाठी त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि यश मिळालं. 2017 मध्ये अक्षत यांना या 16-17 दिवसात परीक्षेची तयारी केली आणि पाचव्या प्रयत्नात 55 व्या क्रमांकावर आला. त्यानंतर त्यांना आयपीएस पदापर्यंत पोहोचण्यात यश आलं आहे.

हे वाचा-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार 2 हजार रुपये!

संपादन- क्रांती कानेटकर

First published:

Tags: Upsc, Upsc exam