मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

‘त्या’ प्रवासाने स्वप्नांना दिली दिशा; धडाडीच्या IPS अधिकारी शालिनी अग्निहोत्रींचा प्रेरणादायी प्रवास

‘त्या’ प्रवासाने स्वप्नांना दिली दिशा; धडाडीच्या IPS अधिकारी शालिनी अग्निहोत्रींचा प्रेरणादायी प्रवास

आयपीएस अधिकारी शालीनी अग्निहोत्री  (IPS Officer Shalini Agnihotri)  यांनी खडतर प्रवासामधून यशस्वी ऑफिसर (Officer) होण्याचा आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.

आयपीएस अधिकारी शालीनी अग्निहोत्री (IPS Officer Shalini Agnihotri) यांनी खडतर प्रवासामधून यशस्वी ऑफिसर (Officer) होण्याचा आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.

आयपीएस अधिकारी शालीनी अग्निहोत्री (IPS Officer Shalini Agnihotri) यांनी खडतर प्रवासामधून यशस्वी ऑफिसर (Officer) होण्याचा आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : युपीएससी परीक्षा (UPSC Exam) पास होण्यासाठी मुलं प्रचंड मेहनत करतात. मात्र, दरवेळी पहिल्या प्रयत्नात यश मिळतं असं नाही. काहीजणांना खूप वेळा प्रयत्न केल्यानंतर यशस्वी होता येतं. आयपीएस प्रयत्नानंतर यश मिळवणाऱ्या आयपीएस अधिकारी शालीनी अग्निहोत्री  (IPS Officer Shalini Agnihotri)  यांनी खडतर प्रवासामधून यशस्वी ऑफिसर (Officer) होण्याचा आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मधल्या एका छोट्याशा गावात शालिनी अग्निहोत्री यांचं बालपण गेलं. त्यांचे वडील बस कंडक्टर होते. लहानपणापासूनच त्यांनी अधिकारी होण्याचं स्वप्न (Dream) पाहिलेलं होतं. शालिनी लहानपणापासूनच यूपीएससी परीक्षेची (UPSC Exam) तयारी करत होत्या. अभ्यासामध्ये त्या खूप हुशार होत्या. पुढील शिक्षणासाठी होस्टेलमध्ये राहत असताना तिथल्या शांत वातावरणाचा त्यांना अभ्यासासाठी फायदा झाला.

महत्त्वाचं म्हणजे शालिनी यांनी आपण UPSCची परीक्षा देत असल्याचं कल्पना कोणालाच दिली नव्हती. परिक्षेत यशस्वी न होण्याची भीती त्यांच्या मनात होती.

(Video:मातृत्वासाठी अस्तित्व विसरणं आवश्यक? Fashion Bloggerने विचारला प्रश्न)

2011 साली त्यांनी UPSC परीक्षा दिली आणि 285 रँक मिळवत IPS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. शालिनी अग्निहोत्री यांनी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईत नेहमीच चर्चेमध्ये असतात. त्या हिमाचल प्रदेशाच्या कॅडर आहेत आणि पोस्टिंगच्या काळात त्यांनी गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण केली आहे.

(आठवड्याचं राशीभविष्य : कसा जाईल हा आठवडा, तुमचं राशीभविष्य जाणून करा प्लानिंग)

त्या घटनेने बदललं आयुष्य

लहान वयात घडलेल्या एका घटनेने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं. लहानपणी आई सोबत बसमध्ये प्रवास करत असताना. त्यांच्याबरोबर एक प्रसंग घडला. त्या दोघी बसलेल्या सीटवर आणखीन एक पुरुष बसला होता. त्याच्या हातामुळे आईला व्यवस्थित बसता येत नव्हतं. आईने खूप प्रयत्न करून त्याला व्यवस्थित बसण्यास सांगूनही तो निट बसत नव्हता.

(अशी बदलंली परिस्थिती की,डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ऋषिता गुप्ता झाल्या IAS)

त्यामुळे त्यांच्या आईल त्रास होत होता. शेवटी त्याला हात बाजूला करण्यास सांगितल्यानंतर त्याने शालिनी यांच्या आईला तू DCP आहेस का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी आईला विचारण्यात आलेला प्रश्न शालिनी यांच्या मनावर कोरला गेला आणि त्यांनी एक अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

First published:

Tags: Inspiring story, IPS Officer, Success stories, Upsc exam