मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /आठवड्याचं राशीभविष्य : कसा जाईल हा आठवडा, तुमचं राशीभविष्य जाणून करा प्लानिंग

आठवड्याचं राशीभविष्य : कसा जाईल हा आठवडा, तुमचं राशीभविष्य जाणून करा प्लानिंग

या आठवड्यातील ग्रह स्थितीनुसार पाहूया या आठवड्याचे राशी भविष्य. या आठवड्यात सूर्य राश्यांतर करणार असून 17 ऑगस्ट रोजी सिंह या आपल्या स्वराशीत प्रवेश करणार आहे. तिथे ती पुढील काही काळ मंगळ आणि बुध या ग्रहांच्या सोबत असेल. हे भ्रमण कोणाला शुभ आहे ते पाहूया.

पुढे वाचा ...

मेष

17 ऑगस्ट रोजी राशीच्या पंचम स्थानात प्रवेश करणारा रवि गुरूशी प्रतियोग करेल. संततीसाठी अत्यंत शुभ काळ सुरू होत असून त्यांची उत्तम प्रगती होईल. उच्च शिक्षणासाठी अनुकूल वेळ आहे. अध्यात्मिक साधना फलद्रुप होईल. नवविवाहिताना गोड बातमी मिळू शकेल. कार्यक्षेत्रात गोष्टी खूप संथ सुरू राहतील. आर्थिक लाभ होतील. षष्ठ स्थानातील शुक्र आरोग्याच्या समस्या निर्माण करेल. प्रकृतीकडे जरा लक्ष असू द्या. उत्तरार्ध शुभ आहे.

वृषभ

राशीच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणारा रवि बुधासोबत बुधादित्य राजयोग करेल. तिथे असलेल्या मंगळावर गुरूच्या अमृत दृष्टीमुळे घरात अनेक शुभ घटना घडतील. काही विशेष पूजा इत्यादी घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. घरात नवनवीन वस्तू खरेदी कराल. आईवडील तुमच्यावर खुश राहतील. मुलांकडे लक्ष असू द्या. नवीन वास्तू होईल. कार्यक्षेत्रात नवीन संधी चालून येतील. यशस्वी आठवडा.

मिथुन

या आठवड्यात गुरू, रवि मंगळ व बुध या ग्रहांशी प्रतियोग करीत आहे. राशीच्या तृतीय स्थानात होणारे हे भ्रमण शुभ असुन तुमच्या जन संपर्कात वाढ होईल. अनेक महत्त्वाची कामे चर्चेतून यशस्वी होतील. नातेवाईक संपर्कात येतील. बहिण भावंडांची उत्तम प्रगती होईल. भाग्य स्थानातील गुरू प्रवास योग आणेल. उत्तरार्ध अनुकूल आहे. शनीची उपासना करावी.

कर्क

धनस्थानात होणारी ग्रहांची उपस्थिती तुम्हाला आर्थिक लाभ मिळवुन देण्यास तत्पर आहे. गुरूच्या शुभ दृष्टीमुळे अनेक मार्ग मोकळे होतील. नवीन खरेदी करण्याची इच्छा होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. गुरूची उपासना लाभ देईल. मात्र मंगळ वाणीमध्ये कठोरता आणेल. कोणाला बोलून दुखावू नका. गुरू उपासना करावी .

सिंह

राशीत होणारे तीन ग्रहांचे आगमन तुम्हाला अनेक पातळीवर अनुकूल बदल घडविणारे आहे. स्वभाव थोडा उग्र होऊ शकतो. धनस्थानातील शुक्र आर्थिक लाभ मिळवून देईल. तसेच खर्च पण होतील. चैनीची आवड निर्माण होईल. जोडीदाराला लाभ संभवतात. पण प्रकृतीची काळजी घ्यावी. कार्यक्षेत्रात बदल संभवतात. मुलांची प्रगती होईल.

कन्या

व्यय स्थानात येणारा सूर्य अणि मंगळ बुध हे काही कायदेशीर किंवा कार्यालयीन घडामोडी घडवतील. आर्थिक किंवा शारीरिक व्यय होईल. पण गुरु महाराज सर्व सांभाळून घेतील. राशीतील शुक्र विलासी वृत्ती देईल. खर्च वाढतील. संतती सुख मिळेल. आठवडा एकुण मध्यम जाईल.

तुला

या आठवड्यात अनेक मार्गाने लाभ होतील. तुम्ही कार्यक्षेत्रात खूप काम केले असेल तर हा आठवडा त्यापासून लाभ मिळण्याचा आहे. चतुर्थ शनि घरात अशांत वातावरण ठेवेल. व्ययस्थानातील शुक्र आर्थिक स्थिती सांभाळा असे सुचवतो. पंचमस्थ गुरू संतती साठी अनुकूल. मित्र मैत्रिणींना भेटून काहीतरी लाभ होईल. उत्तरार्ध अनुकूल.

वृश्चिक

दशमातील ग्रहांची उपस्थिती नव नवीन संधी मिळवुन देणार आहे.परिश्रमाचे फळ नक्की मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. घरांमधे शुभ घटना घडतील. नवीन वास्तूचा योग आहे. संतती संबंधी शुभ कार्य होतील. प्रकृती बरी राहील. स्त्री वर्ग सहकार्य करणार आहे. लाभ होतील. सप्ताह अनुकूल आहे.

धनु

भाग्य तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रवास होतील. नवीन ओळखी  जन संपर्क यातून फायदा होईल. प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होईल. धार्मिक कार्य घडेल. संतती साठी अनुकूल काळ आहे. आर्थिक चिंता कमी होईल. ईश्वरी उपासना करावी.

मकर

या आठवड्यात अष्टम स्थान  बलवान होणार आहे. मंगळ बुध रवि या तीन ग्रहांची उपस्थिती

काही विशिष्ट  अभ्यास, गूढ शास्त्राचे अध्ययन यात यश मिळवून देईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवास टाळा. पोटा संबंधी काही विकार असतील तर दुर्लक्ष करू नका.  जोडीदाराकडून लाभ होतील. जपुन राहण्याचे संकेत आहेत.

कुंभ

राशीतील गुरू  व समोर येणार्‍या रवि मुळे कुंभ व्यक्ती झळाळून उठणार आहेत. तेजस्वी व्यक्तिमत्त्व लोकांवर प्रभाव वाढेल. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. जोडीदाराला काही नवीन संधी मिळवुन देणार आहे.परिश्रमाचे फळ मिळेल. शनीची उपासना करावी.

मीन

रोग स्थानात अनेक ग्रह शत्रू पासून सावध रहा असे सुचवत आहेत. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. जोडीदार अनेक मागण्या करेल. व्यवसाय धंद्यात नवीन संधी मिळतील. मुलाखतीतून यश मिळवून देणारा आठवडा आहे. महिला वर्ग खरेदी मध्ये रमेल. संतती संबंधी थोडी चिंता वाटेल. सप्ताह मध्यम जाईल.

शुभम भवतु!!

First published:
top videos