मराठी बातम्या /बातम्या /करिअर /पहिल्याच प्रयत्नात टॉपर; IAS अनमोल सिंह बेदी 8 तास करायचे अभ्यास

पहिल्याच प्रयत्नात टॉपर; IAS अनमोल सिंह बेदी 8 तास करायचे अभ्यास

हार्ड वर्क आणि टाईम मॅनेजमेंट’ करून UPSC परीक्षेमध्ये यश मिळवून IAS होण्याचं स्वप्न पूर्ण करता येतं असं अनमोल सिंह बेदी सांगतात.

हार्ड वर्क आणि टाईम मॅनेजमेंट’ करून UPSC परीक्षेमध्ये यश मिळवून IAS होण्याचं स्वप्न पूर्ण करता येतं असं अनमोल सिंह बेदी सांगतात.

हार्ड वर्क आणि टाईम मॅनेजमेंट’ करून UPSC परीक्षेमध्ये यश मिळवून IAS होण्याचं स्वप्न पूर्ण करता येतं असं अनमोल सिंह बेदी सांगतात.

नवी दिल्ली, 28 जुलै : आयएएस टॉपर अनमोल सिंह बेदी (IAS Toper Anmol Singh Bedi) यांनी 2016 मध्ये वयाच्या 23व्या वर्षी युपीएससी परीक्षेमध्ये (UPSC Exam) 2 रँक मिळवला. अनमोल सिंग बेदी पंजाबच्या अमृतसर (Amritsar,Punjab) इथले राहणारे आहेत. त्यांचे वडील डॉ. सरबजीत सिंह जालंधरमध्ये NIT मध्ये प्रोफेसर आहेत. तर, त्यांची आई NGO साठी काम करते. अनमोल यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण स्प्रिंग डेल स्कूलमध्ये (Spring Dale School) केलं आहे. त्यानंतर त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (Birla Institute of Technology & Science) मध्ये B.tech मिळवलेला आहे. अनमोल यांनी B.tech करत असतानाच शेवटच्या वर्षांमध्ये त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.

(दहावीत केवळ 44% मिळवणारे अविनाश शरण; मेहनतीने झाले IAS ऑफिसर)

अमोल सिंह यांनी UPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना यशाचा मूलमंत्र सांगितलेला आहे. ‘हार्ड वर्क आणि टाईम मॅनेजमेंट’ करून UPSC परीक्षेमध्ये यश मिळवून IAS होण्याचं स्वप्न पूर्ण करता येतं असं ते सांगतात.

(ब्लड शुगर कंट्रोलसाठी रोज खा काळे चणे; या पद्धतीने खाल्यास जास्त फायदा)

अनमोल यांनी UPSC परीक्षेसाठी 8 तास सातत्याने अभ्यास केला. त्यांनी इतिहास या विषयासाठी बिपिनचंद्र, इंडियन पॉलिटिक्ससाठी लक्ष्मिकांत आणि इंडियन इकॉनोमिक्ससाठी रमेश सिंह यांची पुस्तक वाचण्याचा सल्ला दिलेला आहे. याशिवाय एनसीईआरटीच्या पुस्तकांचा आणि करंट अफेयर्ससाठी पेपर वाचण्याचा सल्ला ते देतात. अनमोल यांनी पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडला.

(ती होती म्हणून आज टाटा आहे; या महिलेने जमशेदजींच्या कंपनीला बुडण्यापासून वाचवलं)

मेन्स परीक्षेची तयारी करत असताना त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना खुप सहकार्य केलं. अनमोल सांगतात त्यांची बहीण गुरमीत यांनी प्रत्येक वेळी सांभाळून घेतलं. अनमोल यांच्यामते अपयशानंतर देखील न हरता प्रयत्न करत राहिलं तर UPSC परीक्षा पास होता येते.

First published:

Tags: Ias officer, Inspiring story, Success story, Upsc exam