Home /News /money /

'ती' होती म्हणून आज 'टाटा' आहे; एकट्या महिलेने जमशेदजींच्या कंपनीला बुडण्यापासून वाचवलं

'ती' होती म्हणून आज 'टाटा' आहे; एकट्या महिलेने जमशेदजींच्या कंपनीला बुडण्यापासून वाचवलं

टाटा स्टील या देशातल्या मोठ्या कंपनीला बुडण्यापासून वाचवण्यातही या महिलेचं मोठं योगदान आहे.

नवी दिल्ली, 27 जुलै :  टाटा (Tata) म्हटलं की सर्वात समोर येतात ते जमशेदजी टाटा. पण त्यांच्या या कंपनीत सर्वात मोठा वाटा आहे तो एका महिलेचा. खरंतर आज जी टाटा कंपनी उभी आहे ती या एकट्या महिलेमुळेच. त्या म्हणजे लेडी मेहेरबाई टाटा (Lady Meherbai Tata) . ज्यांच्यामुळे टाटा स्टील (Tata steel) कंपनीला आजची ओळख मिळाली आहे. मेहेरबाई टाटा यांना भारतीय स्त्रीवादी प्रतीकांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. बालविवाह पद्धतीच्या निर्मूलनापासून महिलांना मताधिकार मिळण्यापर्यंत आणि मुलींच्या शिक्षणापासून पडदा पद्धत हटवण्यापर्यंतच्या वेगवेगळ्या चळवळींशी लेडी मेहेरबाई टाटा यांचं नाव जोडलं गेलेलं आहे. टाटा स्टील या देशातल्या सर्वांत मोठ्या स्टील कंपनीला बुडण्यापासून वाचवण्यातही त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांची कहाणी प्रेरक आहे. हरीश भट यांनी 'टाटा स्टोरीज' (TataStories) या आपल्या नव्या पुस्तकात याबद्दलची माहिती दिली आहे. जमशेदजी टाटा यांचे मोठे पुत्र सर दोराबजी टाटा यांनी आपली पत्नी लेडी मेहेरबाई यांच्यासाठी लंडनच्या व्यापाऱ्यांकडून 245.35 कॅरेटचा ज्युबिली हिरा (Jubilee Diamond) खरेदी केली होता. तो कोहिनूर हिऱ्यापेक्षा (105.6 कॅरेट, कट) दुप्पट मोठा होता. 1900च्या दशकात त्या हिऱ्याची किंमत सुमारे 1,00,000 पौंड होती. या अत्यंत महागड्या हिऱ्याचा हार लेडी मेहेरबाई यांच्यासाठी इतका खास होता, की तो त्यांनी खास कार्यक्रमांत घालण्यासाठी ठेवला होता. 1924मध्ये मात्र परिस्थिती अशी काही बदलली, की लेडी मेहेरबाई यांनी हा हार विकण्याचा निर्णय घेतला. हे वाचा - ना कोचिंग क्लास, ना मार्गदर्शन; पहिल्याच प्रयत्नात UPSC टॉपर 22व्या वर्षी IAS त्या वेळी असं झालं होतं, की टाटा स्टील कंपनीपुढे पैशांचं संकट येऊन ठेपलं होतं. कंपनीकडे कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठीही पैसे उरले नव्हते. त्या वेळी लेडी मेहेरबाई यांना कंपनीचे कर्मचारी आणि कंपनी यांना वाचवणं जास्त महत्त्वाचं वाटलं. त्यांनी ज्युबिली हिऱ्यासह आपली सगळी खासगी संपत्ती इम्पीरियल बँकेकडे गहाण ठेवली, जेणेकरून टाटा स्टील कंपनीसाठी (Tata Steel) निधी उभारला जाऊ शकेल. खूप मोठ्या कालावधीनंतर कंपनीतून नफा मिळू लागला आणि परिस्थिती सुधारली. अत्यंत कठीण परिस्थिती असूनही त्या वेळी एकाही कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आलं नव्हतं, असं भट यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. टाटा समूहाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या (Sir Dorabaji Tata Trust) स्थापनेसाठी सर दोराबजी टाटा यांच्या मृत्यूनंतर ज्युबिली हिरा विकण्यात आला होता. हे वाचा - दहावीत केवळ 44% मिळवणारे अविनाश शरण; मेहनतीने झाले IAS ऑफिसर 1929मध्ये पारित झालेला शारदा अधिनियम अर्थात बालविवाह प्रतिबंध अधिनियमासाठी ज्या व्यक्तींसोबत चर्चा करण्यात आली होती, त्यामध्ये लेडी मेहेरबाई यांचा समावेश होता. भारतासह त्यांनी परदेशातही त्याचा सक्रियपणे प्रचार-प्रसार केला. राष्ट्रीय महिला परिषद आणि अखिल भारतीय महिला संमेलनातही त्यांचा सहभाग होता. 29 नोव्हेंबर 1927 रोजी लेडी मेहेरबाई यांनी मिशिगनमध्ये हिंदू विवाह विधेयकासाठी प्रयत्न केले. 1930मध्ये अखिल भारतीय महिला संमेलनात त्यांनी महिलांना समान राजकीय अधिकार मिळण्याची मागणी केली. भारतीय महिला लीग संघाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. तसंच, बॉम्बे प्रेसिडेन्सी महिला परिषदेच्या संस्थापकांपैकी त्या एक होत्या. लेडी मेहेरबाईंच्या नेतृत्वाखाली भारताला आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती.
First published:

Tags: Money, Tata group

पुढील बातम्या