Home /News /career /

IAS ऑफिसर होण्यासाठी सोडलं इंजीनिअरिंगच शिक्षण; सिमी करण यांच्या यशाचा प्रवास

IAS ऑफिसर होण्यासाठी सोडलं इंजीनिअरिंगच शिक्षण; सिमी करण यांच्या यशाचा प्रवास

सिमी यांनी नोट्स काढण्यावर भर द्यायला सांगितलं आहे.

सिमी यांनी नोट्स काढण्यावर भर द्यायला सांगितलं आहे.

UPSC परीक्षेत 31 वा रँक मिळवणाऱ्या सिमी करण यांनी IITची एन्ट्रन्स परीक्षाही पास केली होती.

    दिल्ली, 17 जून: देशभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी UPSC परीक्षा पास होण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. मात्र फार कमी लोकांना या परीक्षांमध्ये यश मिळतं. IAS ऑफिसर सिमी करण (IAS Simi Karan) यांनी  UPSCची परीक्षा पास होऊन IAS ऑफिसर होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. सिमी यांना लहानपणापासूनच देशसेवा करण्याची इच्छा होती त्यामुळेच IITची एंट्रन्स एक्झाम (IIT Entrance Exam) पास झाल्यानंतर देखील त्यांनी UPSCची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मेहनतीने यश देखील मिळवलं. सिमी करण यांनी 2019 ला UPSC परीक्षा दिली आणि 31वा रँक मिळवला. UPSC परीक्षा मधलं हे यश त्यांनी सहजपणे मिळवलेलं नाही. त्यासाठी त्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागले आहेत. सिमी सांगतात जेव्हा इंजीनिअरिंगचे(Engineering)लेक्चर सुरू असायचे त्यावेळेस मिळालेला छोटासा वेळही त्या या परिक्षेच्या अभ्यासासाठी वापरायच्या. (बदला वयात येणाऱ्या मुलींशी वागण्याची पद्धत; चुकूनही सांगू नका ‘या’ गोष्टी) त्यासाठी मित्रमैत्रिणींच्या भेटी,पार्टी, गेट टूगेदर सगळ्यातून त्यांनी मन काढून टाकलं आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं. सिमी सांगतात अभ्यासाचा प्लॅनिंग केलं आणि स्ट्रॅटेजी ठरवली तर कोणतीही परीक्षा पास होऊ शकतो. त्यांनीही आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवलेली होती. UPSCची तयारी करण्याआधी त्यांनी UPSC परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची एक लिस्ट तयार केली. त्यांच्या मुलाखतींचा अभ्यास केला आणि त्यानंतर कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करायचा याचा निर्णय घेतला. त्यांनी UPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची उजळणी करण्यावर भर देण्यास सांगितलं आहे. (16 फ्रॅक्चर, 8 ऑपरेशन तरीही हिंमत न हरता UPSC त मिळवलं यश; IAS उम्मुलचं यश) त्या म्हणतात खरंतर UPSC परीक्षा देताना विद्यार्थ्यांना खूप जास्त टेन्शन आलेला असतं मात्र, जर सुरुवातीपासूनच आखणी करून अभ्यास केला तर, परीक्षा जवळ येताना रिविजनला वेळ मिळतो आणि त्यामुळेच परीक्षेच टेन्शन रहात नाही आणि कोणत्याही शंका मनात येत नाहीत. सिमी यांनी नोट्स काढण्यावर भर द्यायला सांगितलं आहे. त्या म्हणतात अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नोट्स स्वतः बनवल्या तर, रिविजन करताना खूप फायदा मिळतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ias officer, Inspection, Inspiring story, Success stories, Success story

    पुढील बातम्या