मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

16 फ्रॅक्चर, 8 ऑपरेशन तरीही हिंमत न हरता UPSC परीक्षेत मिळवलं यश; IAS उम्मुलचं यश

16 फ्रॅक्चर, 8 ऑपरेशन तरीही हिंमत न हरता UPSC परीक्षेत मिळवलं यश; IAS उम्मुलचं यश

अम्मुलने जिद्दीने आपला अभ्यास सुरू केला.

अम्मुलने जिद्दीने आपला अभ्यास सुरू केला.

झोपडीत राहणारं कुटुंब, हातगाडी चालवणारे वडील आणि 4 भावंडं त्या सगळ्यांचं आयुष्य बदलण्यासाठी उम्मुल खेरने (IAS Ummul Kher) स्वप्नवत वाटणारा प्रवास...

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 9 जून :  मनात जिद्द आहे, काहीतरी करून दाखवण्याचा धमक आहे आणि मेहनतीची तयारी आहे तर, तुमच्या आयुष्यातल्या अडचणी (inspiration story) देखील गपचूप मान खाली घालून निघून जातील. याचं ताजं उदाहरण आहे आयएएस अधिकारी उम्मुल खेर (IAS Officer Ummul Kher), उम्मुल खेरे ही अशी मुलगी आहे जिला एका अपघातामुळे (Accident) 16 फ्रॅक्चर झाले होते. त्यासाठी 8  ऑपरेशन (Operation) करावे लागले. तरी देखील हिंमत न हरता तिने आपलं ध्येय गाठलं आणि स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबीयांची ही आयुष्य सुधारलं.

दिल्लीच्या (Delhi) निजामुद्दीनमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारी अम्मुल लहानपणापासूनच हुशार होती. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पालकांना दिला शिकवणं कठीण होतं. तरी तिची शिक्षणासाठी मेहनत घेण्याची तयारी होती. उम्मुलचं कुटुंब मुळचं राजस्थानच्या (Rajasthan) पाली मारवाड इथलं. घरची गरिबी 4 भावंड या परिस्थितीत अम्मुल 5 वर्षांची असतांना ते दिल्लीत आले. दिल्लीमध्ये त्यांच्या झोपड्या तोडण्यात आल्यानंतर त्यांचं कुटुंब त्रिलोकपुरीमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहायला गेलं.

(डेल्टानंतर भारतात आणखी एक भयंकर कोरोना; पुण्यात सापडला सर्वात घातक स्ट्रेन)

अम्मुल हुशार होती त्यामुळे तिने खूप कमी वयामध्ये घरच्या घरीच क्लासेस घ्यायला सुरुवात करून आपल्या कुटुंबाला हातभार लावला. तिचे वडील हातगाडी चालवायचे. त्या दोघांच्या कमाईने त्यांच्या कुटुंबाची जेवणाची व्यवस्था व्हायची. तिला लहानपणापासूनच हाडं कमजोर करणारा ऑस्टियो जेनेसिस (Osteo Genesis) नावाचा आजार होता. त्यावर मात करून ती आपलं शिक्षण पूर्ण करत कुटुंबालाही मदत करत होती.

2008 मध्ये तिने अर्वाचिन इथून बारावीची परीक्षा दिली आणि त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये (Delhi University)मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. 2011 मध्ये आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

(मोठी बातमी! पुण्यातील पाण्यातही सापडला कोरोनाव्हायरस; संसर्गाचा धोका किती?)

मग जेएनयुची (JNU)कठीण एन्ट्रन्स एक्झाम पास झाली. जेएनयुमध्ये एमएचा (MA) अभ्यास सुरू केला एवढ्यावरच अम्मुल थांबली नाही तिने पीएचडीचा(PHD)अभ्यास सुरू केला. मात्र, डॉक्टरेट (Doctored) मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अम्मुलच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. 2012 मध्ये तिचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये तिला 16 फ्रॅक्चर झाले. यासाठी तिच्यावर 8 सर्जरी करण्यात आल्या आणि त्यानंतर तिच्या नशिबात व्हीलचेअर आली, पण, अम्मुल हार मानणाऱ्यातली नव्हती. अम्मुलने आपला अभ्यास सुरू ठेवला. सर्जरी झाल्यानंतर रिकव्हरी झाल्यावर पुन्हा मेहनत घेतली. 2016ला तिने युपीएससी (UPSC) पास झाली आणि 420 रॅन्क मिळवत आयएएस (IAS)अधिकारी बनली. युपीएससीच्या परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात. फार कमी विद्यार्थी अम्मुल सारखे असतात जे कोणत्याही आजारावर,अडचणीवर,संकटावर मात करून आपलं ध्येय गाठतात.

First published:

Tags: Inspiration, Inspiring story, Success, Success story