Home /News /career /

शेतमजूर वडिलांच्या मेहनती मुलाची प्रेरणादायी कहाणी; शरण कांबळे यांनी UPSC परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

शेतमजूर वडिलांच्या मेहनती मुलाची प्रेरणादायी कहाणी; शरण कांबळे यांनी UPSC परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

शरण कांबळे यांनी UPSC परीक्षेत मिळालं घवघवीत यश

शरण कांबळे यांनी UPSC परीक्षेत मिळालं घवघवीत यश

Inspiration: सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात वाढलेले आणि आता IAS ऑफिसर झालेले शरण कांबळे (IAS Officer Sharan Kamble) यांचे वडील मजुरीचं काम करायचे.

    मुंबई,18 जून : UPSC परीक्षेची तयारी देशभरातील लाखो विद्यार्थी करतात मात्र फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये यश मिळतं. महाराष्ट्रातल्या 1 मेहनती मुलाने देखील UPSC परीक्षेमध्ये यश मिळवत IAS होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे वडील शेतमजूर (laborer's son becom IAS officer) आहेत आणि आई भाजी विकते(Vegetable seller).अतिशय हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये (Success Story)त्यांनी अभ्यास करणं सोडलं नाही. या विद्यार्थ्याचं देशभरात कौतुक केलं जातंय. त्याचं नाव आहे IAS ऑफिसर शरण कांबळे (IAS Officer Sharan Kamble). शरण कांबळे त्यांनी UPSC परीक्षेमध्ये आठवा रँक मिळवलेला आहे. महाराष्ट्रातील(Maharashtra)सोलापूर जिल्ह्यातल्या (Sholapur) एका छोट्याशा गावांमध्ये त्यांचे वडील मजुरीचं काम करतात. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शरण कांबळे यांना खांद्यावर बसवून गावांमध्ये मिरवणूक काढण्यात आली. शरण कांबळे यांनी आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय आपल्या कुटुंबाला दिलं आहे. (डिओड्रन्टच्या वापराने होतो स्तनांचा कॅन्सर; काय सांगतं संशोधन?) शरद कांबळे यांच्या यशाने त्यांचे आई-वडील देखील भारावून गेले आहेत. शरण कांबळे यांची कहाणी मन हेलावणारी आहे. आई-वडील मजुरी करणारे असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. शरण सांगतात कधीकधी अभ्यासाच्या खर्चासाठी पैसे वाचण्याकरता त्यांना उपाशी झोपावं लागायचं. (IAS ऑफिसर बनण्यासाठी सोडलं इंजीनियरिंगच शिक्षण; सिमी करण यांच्या यशाचा प्रवास) लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची आवड होती मात्र, घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. शरण यांची आई भाजी विकायचं काम करायची तर, वडील मजुरी करायचे. माकत्र शरण यांच्या मोठ्या भावाला नोकरी लागल्यानंतर आर्थिक परिस्थिती थोडीशी बरी झाली. त्यानंतर त्यांनी बीटेक करून नोकरी करायला सुरुवात केली. मात्र मनामध्ये IAS बनण्याचं स्वप्न होतं. त्यामुळेच आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन UPSC परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. (संधी सोडू नका, भरपूर खा! फक्त पावसाळ्यात मिळतात या बहुगुणी रानभाज्या) शरद कांबळे यांनी UPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. ते सांगतात बऱ्याचदा विद्यार्थी फक्त पुस्तकांचा अभ्यास करतात. मात्र पुस्तकांचा अभ्यास करण्यापेक्षा नोट्स काढण्यावर भर द्यायला हवा. ज्यामुळे अभ्यासाची उजळी करताना याचा फायदा होतो. नोट्समुळे अभ्याक्रम फार छोटा होतो आणि त्यामुळे कमी वेळामध्ये अभ्यास करतो. परीक्षा जवळ आल्यानंतर सहजपणे रिविजन करून आपल्याला अभ्यास पूर्ण करता येतो. शरण सांगतात UPSC परीक्षेसाठी कितीही चांगला कोचिंग क्लास लावला तरी मेहनत स्वतःलाच करावी लागते. त्यामुळे कमीत कमी पुस्तकांचा अभ्यास करून रिविजनवरती लक्ष केंद्रित करावं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Inspection, Inspiring story, Success stories, Success story, Successful Stories

    पुढील बातम्या