मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

जिद्दीला सलाम! हिंमत न सोडता 5 वेळा दिली UPSCची परीक्षा; IAS जुनैद अहमद यांची प्रेरणादायक कहाणी

जिद्दीला सलाम! हिंमत न सोडता 5 वेळा दिली UPSCची परीक्षा; IAS जुनैद अहमद यांची प्रेरणादायक कहाणी

जुनेद अहमद यांनी UPSC परीक्षेत चौथ्या प्रयत्नात पास होऊन देखील मनासारखा रँक न मिळाल्यामुळे पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.

जुनेद अहमद यांनी UPSC परीक्षेत चौथ्या प्रयत्नात पास होऊन देखील मनासारखा रँक न मिळाल्यामुळे पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.

जुनेद अहमद यांनी UPSC परीक्षेत चौथ्या प्रयत्नात पास होऊन देखील मनासारखा रँक न मिळाल्यामुळे पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 16 जून : आपल्या कतृत्वाने उत्तम IAS ऑफिसर म्हणून देशात नाव कमावणारे जुनैद अहमद (Junaid Ahmed) शालेय अभ्यासात फारसे हुशार नव्हते. तरीही त्यांनी ऑफिसर बनण्याचा ध्यास धरला होता. उत्तर प्रदेश मधील बिजनोरचे (Bijnor,Uttar Pradesh) जुनैद अहमद यांनी तब्बल 5 वेळा युपीएससीची परीक्षा दिलेली. मनासारखं यश मिळत नसतानाही त्यांनी न हरता परीक्षा देणं सुरूच ठेवलं. चौथ्यांदा तर ते UPSCची परीक्षा पास झाले. मात्र त्यांना 352 रँक मिळाला होता. पण IAS  ऑफिसर बनण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि 2019 मध्ये UPSCची परीक्षा दिली. यावेळी संपूर्ण देशात त्यांनी तिसरा रँक मिळवला आणि IAS ऑफिसर बनले. यासंदर्भात जनसत्ता मध्ये माहिती देण्यात आली आहे.

जुनैद सध्या दिल्लीमध्ये IAS ऑफिसर म्हणून काम करतात. लहानपणापासूनच त्यांनी अधिकारी बनवण्याचा निश्चय मनाशी पक्का होता. जुनैद अहमद यांचं सुरुवातीचं शिक्षण बिजनोर इथून झालं. त्यानंतर त्यांनी अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये (Aligarh Muslim University) पुढील शिक्षण सुरू केलं.

(लग्नात मिळालं असं गिफ्ट; पाहताच नवरी झाली लाजेनं गुलाबी, नवरदेव हैराण)

अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये बारावीपर्यंतच शिक्षण केल्यानंतर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये (Indira Gandhi National Open University) ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर UPSCची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. जुनैद अभ्यासामध्ये फारसे हुशार नव्हते. ग्रॅज्युएशनपर्यंत तर त्यांना चांगली टक्केवारी देखील मिळत नव्हती. मात्र त्यांनी IAS ऑफिसर बनण्याचा निर्णय पक्का केला होता.

(शवासन करत होता मालक, छातीवर बसला कुत्रा आणि...; VIDEO पाहून तुम्हीही चक्रवाल)

UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही जुनैद हाच सल्ला देता. त्यांचा सल्ला महत्त्वाचा आहे. जुनैद सांगतात “अपयशाला घाबरून प्रयत्न करणं सोडू नका”. UPSCची परीक्षा देण्याचा निर्णय घेतल्यावर सुरुवातीलाच त्यांना अनेकांनी डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि शक्य तितकी मेहनत करून आपलं स्वप्न पूर्ण केलं.

First published:

Tags: Inspection, Inspiring story, Success stories, Success story