नवी दिल्ली, 16 जून : हवेतून प्रवास करण्याचं स्वप्न माणसानं विमानाच्या रुपानं (Flying in air) साकारलं. त्यानंतर माणूस पॅराशूट किंवा एअर बलूनच्या सहाय्याने देखील हवेत भरारी घेऊ लागला. पण ही कोणतीही साधनं न वापरता हवेत भरारी घेता आली तर? होय, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. केवळ एक खास ड्रेस (Flying Suit) परिधान करून हवेत भरारी घेत एका खेळाडूनं विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे.
ब्रिटनमधील रिचर्ड ब्राऊनिंगने (Richard Browning) फ्लाईंग सूटची निर्मिती केली आणि स्पीड इव्हेंटमध्ये जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्ट (Usain Bolt) याचा विश्वविक्रम (World Record) मोडला आहे, हा सूट परिधान करून तो हवेत उडू लागला. याआधारे त्याने 3 विश्व विक्रम देखील मोडीत काढले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness Book Of World Record) आयोजित केलेल्या स्पीड इव्हेंटमध्ये हे रेकॉर्ड तोडले.
View this post on Instagram
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने प्रथमच अँकर स्पीड स्पर्धेचे आयोजन केलं होतं. या स्पर्धेला जेट सूट ट्रायएथलॉन असं नाव देण्यात आलं.
हे वाचा - VIDEO - जिम सुरू होताच पुण्याच्या डॉक्टरबाई जोमात, साडीवरच केला 'झिंगाट' वर्कआऊट
जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टचा विश्वविक्रम मोडणं हे रिचर्डचं ध्येय होतं. बोल्टने 100 मीटर शर्यत 9.58 सेकंदात पूर्ण केली आहे आणि हा एक विश्व विक्रम आहे. तर रिचर्डने जेट इंजिन पावर सूटच्या माध्यमातून हेच अंतर केवळ 7.69 सेकंदात पूर्ण केलं. जेट इंजिन पावर सूट परिधान करून आपली बॉडी कंट्रोल करत ती 100 मीटर स्प्रिंट करण्याचं आव्हान रिचर्डसमोर आव्हान होतं.
View this post on Instagram
या 100 मीटर स्पर्धेनंतर रिचर्ड 400 मीटर हर्डल रेससाठी तयार झाला. यासाठी 100 मीटर शर्यतीप्रमाणे यावेळी तुला वेगात हवेत भरारी घेता येणार नाही, असा निर्देश त्याला यावेळी दिला गेला. तसंच हर्डलच्या समोर येताच त्याला खाली-वर हालचाली कराव्या लागतील आणि त्यामुळे यात स्पीड आणि कंट्रोल अशा कॉम्बिनेशनचा वापर होईल, असंदेखील सांगण्यात आलं.
View this post on Instagram
या शर्यतीत रिचर्डला साथ देण्यासाठी साउथहॅम्पटनचा अॅथलेट केलम ग्रेगसनदेखील होता. ग्रेगसन आणि रिचर्डचे यावेळी केवळ एका विक्रमाकडेच लक्ष होतं. 1992 मध्ये 400 मीटरच्या हर्डल शर्यतीत केवळ 46.87 सेकंदात हा विक्रम करण्यात आला होता. रिचर्ड सूट घालून तर ग्रेगसन प्रत्यक्ष ट्रॅकवर धावत होता. दोघांनी शानदार सुरुवात केली. परंतु, काही वेळानंतर ग्रेगसन पिछाडीवर गेला आणि रिचर्ड सातत्याने शानदार खेळी करत होता. या शानदार खेळीतून तो 400 मीटर हर्डल स्पर्धेतही विश्व विक्रम प्रस्थापित करू शकला. रिचर्डने ही स्पर्धा केवळ 42.06 सेकंदात पूर्ण केली.
हे वाचा - डोनाल्ड ट्रम्पवर कुल्फी विकायची वेळ आली की काय? पाहा VIDEO आणि वाचा सत्य
1992मध्ये केविन यंगने स्पेन ऑलिम्पिकमध्ये (Olympic) सुवर्णपदक मिळवत हा विक्रम स्थापित केला होता. परंतु, रिचर्ड इतक्यावरच थांबला नाही तर त्याने त्यानंतर पोल वॉल्ट चॅलेंजमध्येही विश्व विक्रम केला. रिचर्डने हे चॅलेंज केवळ 13.09 सेकंदात पूर्ण केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, World record