Home /News /lifestyle /

वर्किंग कपल्स या 4 महत्त्वाच्या फायद्यांसाठी हो म्हणतायत Joint Family ला

वर्किंग कपल्स या 4 महत्त्वाच्या फायद्यांसाठी हो म्हणतायत Joint Family ला

चाणक्य यांनी जेवणाला खुप महत्वाचं मानलं आहे. सदृढ शरीरासाठी प्रत्येकाने वेळेवर जेवण करावं असं ते म्हणतात. जगण्यासाठी खाणं आवश्यक आहे,पण खाण्यासाठी जगू नका असंही ते सांगतात.

चाणक्य यांनी जेवणाला खुप महत्वाचं मानलं आहे. सदृढ शरीरासाठी प्रत्येकाने वेळेवर जेवण करावं असं ते म्हणतात. जगण्यासाठी खाणं आवश्यक आहे,पण खाण्यासाठी जगू नका असंही ते सांगतात.

आता विभक्त कुटुंब पद्धती (Divided Family) वाढलेली आहे. पण, खरंतर, मुंलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर एकत्र कुटुंबात राहण्याला (Joint Family) महत्व द्या.

    नवी दिल्ली, 31 जुलै : भारतामध्ये पूर्वीपासूनच एकत्र कुटुंब पद्धती (Joint Family) अस्तित्वात आहे. एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे एकाच छताखाली अनेक पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत असतात. आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकी त्यांची मुलं अशी सगळी भावंडं एकत्र राहत असतात. मात्र, काही कारणामुळे पूर्वीपासून अस्तित्वात असलेली जॉईन्ट फॅमिलीची कल्पना आता लोप पावत (Disappear) चाललेली आहे. आता न्यूक्लियर फॅमिलीचा (Nuclear Family) काळ येऊ लागलेला आहे. जिथे आई वडील आणि मुलं फक्त एकत्र राहतात. मात्र न्यूक्लिअर फॅमिलीपेक्षा म्हणजेच विभक्त कुटुंब (Divided Family) पद्धतीपेक्षा एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे (Benefits) जास्त आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांना चुलत भावंडं, काका-काकी, आजोबा-आजी यांच्याबरोबर राहण्याची आणि त्यांचा प्रेम मिळवण्याची संधी मिळते. यामुळे मुलांना मोठ्यांचे संस्कार मिळतात. त्यांच्यावर सर्वांचा आदर करण्याचे संस्कार होतात. पाहुयात एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे. (कॅफिनचं Tension सोडा! रोज सकाळी घ्या कॉफी; डायबिटीस,ब्लडप्रेशर राहील नियंत्रणात) कौटुंबिक मूल्यांची जाणीव होते बरचश्या गोष्टी पालकांना आपल्या मुलांना शिकवायच्या असतात मात्र, त्यांच्या धावपळीच्या आयुष्यामळे त्यांना या गोष्टी मुलांना शिकवता येत नाहीत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलं आपोआपच एकमेकांना सांभाळून घेणं, प्रेम करणं, भावना व्यक्त करणं या गोष्टी शिकता येतात. त्यामुळे मुलांचं कुटुंबाप्रती प्रेम वाढत राहतं. (Pecan Nuts आहेत न्युट्रिशनचं पॉवर हाऊस; झटपट एनर्जीसाठी रोज खा) नोकरी करणाऱ्या पालकांसाठी फायदा नोकरी करणाऱ्या पालकांसाठी एकत्र कुटुंब पद्धती वरदाना प्रमाणे आहे. पालक नोकरीनिमित्त घराबाहेर पडले तरी मुलांना पाळणाघरात ठेवायची गरज पडत नाही. त्यांचे काका-काकी आणि आजी-आजोबा त्यांचा सांभाळ करतात. त्यामुळेच घराबाहेर निश्चिंतपणे काम करता येतं आणि स्वतःला वेळही देता येतो. कांमांच ओझं पडत नाही एकत्र कुटुंब हे मोठं कुटुंब असतं. त्यामुळे यात कुटुंबाचे सदस्य जास्त असले तरीही कामं करताना याचा फायदा होतो. जेवण बनवणं, घरातली काम, मुलांचा सांभाळ, अभ्यास या सगळ्यामध्ये कुटुंबातल्या सदस्यांची मदत मिळत असते. त्यामुळेच एका व्यक्तीवर त्याचा भार पडत नाही. (कोरोनावर भारी पडतोय Natto; व्हायरसशी लढणारा सुपर ब्रेकफास्ट) आर्थिक गणित चुकत नाही जॉईन्ट फॅमिलीमध्ये घरखर्चासाठी पैसे एकत्र केले जाता. दर महिन्याला कुटुंबातले कमावते सदस्य कुटुंब प्रमुखाला घर खर्चासाठी पैसे देतात. त्यामुळे घरांमधल्या खर्चाचा भार एकाच व्यक्तीवर पडत नाही. त्यामुळे सेव्हिंग करता येतात किंवा एखाद्या सदस्याचं आर्थिक नुकसान झालं किंवा नोकरी गेली तरी टेन्शन येत नाही. कारण कुटुंबातले सदस्य त्यांच्या गरजांची काळजी घेतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Parents and child

    पुढील बातम्या