खरं तर, योनीमध्ये जवळजवळ 50 प्रकारचे मायक्राब्स म्हणजे सुक्ष्मजंतू असतात ते बऱ्यापैकी बाह्य संसर्गापासून बचाव करण्यात आणि योनी निरोगी ठेवण्यासाठी काम करतात. अशा परिस्थितीत जेव्हा असुरक्षित संभोग,हार्मोनल चेन्ज, मासीक पाळी, अस्वच्छता अशा परिस्थितीत मायक्राब्स सक्रिय होतात आणि योनीला संरक्षण देतात.
तज्ज्ञांच्या मते योनिमार्गाचा PH बॅलन्स ठेवण्यासाठी आणि इन्फेक्शन टाळण्यासाठी महिलांनी त्यांच्या आहारात दही किंवा प्रोबियटिक्स कॅप्सूलचा समावेश केला पाहिजे. 1996 साली करण्यात आलेल्या संशोधनानुसार ज्या महिलांनी आपल्या आहारात जास्त प्रोबायोटिक्स घेतले त्यांना अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला नाही.