Home /News /career /

IIT ग्रॅज्युएट ऋषिकेश रेड्डींनी सोडलं नाही IAS चं स्वप्न; चार वेळा अपयशी ठरूनही हार नाही मानली

IIT ग्रॅज्युएट ऋषिकेश रेड्डींनी सोडलं नाही IAS चं स्वप्न; चार वेळा अपयशी ठरूनही हार नाही मानली

दिल्ली IIT मध्ये शिक्षण घेतलेले ऋषिकेश रेड्डी पाचव्या प्रयत्नांत IAS ऑफिसर (IAS Rushikesh Reddy) झाले आहेत. अपयाशाने खचून न जाता त्यांनी नोट्स तयार करण्यावर भर देण्याचा सल्ला दिलाय.

    दिल्ली, 26 जून : UPSCची परीक्षा (UPSC Exam) पास करणं तितकं सोपं नसतं. देशभरातील लाखो विद्यार्थी या परीक्षेला दरवर्षी बसतात मात्र, काही मोजक्या विद्यार्थ्यांना यश मिळतं तर, काही विद्यार्थी बऱ्याचं प्रयत्नानंतर UPSCचा नाद सोडून देतात. मात्र, काही विद्यार्थी सातत्याने प्रयत्न करून न हरता IAS ऑफिसर बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करतात. अशाच विद्यार्थ्यांमध्ये ऋषिकेश रेड्डी (IAS Rushikesh Reddy) यांचाही समावेश होऊ शकतो. ऋषिकेश रेड्डी यांनी चार वेळा UPSCची परीक्षा दिली. मात्र, त्यांना अपयशच मिळालं पाचव्या प्रयत्नांमध्ये त्यांना 95 वा रँक मिळाला आणि ते IAS ऑफीसर बनले. (Photography मध्ये करिअर करण्याचा विचार करताय? इथे मिळेल संपूर्ण माहिती) ऋषिकेश रेड्डी हे आंध्र प्रदेशचे राहणारे आहेत. लहानपणापासुनच अतिशय हुशार असल्याने बारावीनंतर त्यांनी दिल्ली IITमध्ये (IIT Delhi) ॲडमिशन मिळालं. शिक्षण घेत असतानाच त्यांनी UPSCची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार तयारी सुरू केली. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऋषिकेश रेड्डी यांनी महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. ते सांगतात, ‘पुस्तकांबरोबर इंटरनेटवरही मोठ्या प्रमाणामध्ये माहिती मिळू शकते. जिचा वापर आपण अभ्यासामध्ये करू शकतो’. (रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाळू मुलाची अवकाश झेप! वायुदलात Flying Officer) ‘दुसऱ्यांच्या नोट्स वापरण्यापेक्षा सेल्फ स्टडीने UPSC परीक्षेत फायदा मिळतो’ असंही ऋषिकेश रेड्डी सांगतात. ते म्हणतात UPSC परीक्षेमध्ये कितीही अडचणी आल्या तरी हिंमत न हरता आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. ‘योग्य नोट्स आणि चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर UPSC परीक्षेमध्ये यश मिळतं’असं ऋषिकेश म्हणतात. (चहा विकणाऱ्या वडिलांचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात झाला IAS; देशल दान यांची प्रेरणा) बऱ्याचदा मुलं पुस्तकांमध्ये हायलाईट्स करतात ज्यामुळे रिविजनच्या वेळेस अडचणी येतात. त्यापेक्षा विद्यार्थ्यांनी पुस्तकांमधून नोट्स तयार केल्या तर, परीक्षेच्या वेळी याचा जास्त फायदा होतो. ऋषिकेश यांनी अभ्यासाबरोबर पेपर सोडवण्यावर जास्त भर दिला. त्यामुळे त्यांना प्रिलियममध्ये जास्त फायदा मिळाला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Inspiration, Inspiring story, Success stories, Success story, Upsc exam

    पुढील बातम्या