मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UPSC Tips: परीक्षेसाठी कोणत्या कॅटेगिरीला किती असतात Attempt? किती असतो पगार? इथे मिळेल माहिती

UPSC Tips: परीक्षेसाठी कोणत्या कॅटेगिरीला किती असतात Attempt? किती असतो पगार? इथे मिळेल माहिती

UPSC परीक्षेबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

UPSC परीक्षेबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

तुम्हाला UPSC परीक्षेबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टीमाहिती असणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 21 सप्टेंबर: दरवर्षी देशातील लाखो तरुणांचे UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न असते. प्रत्येकजण त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होण्याची आकांक्षा बाळगतो. जर तुम्ही घरी राहून आयएएस अधिकारी बनण्याची तयारी करत असाल तर तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार UPSC परीक्षा पास करू शकता. तसंच अगदी कमी वयात तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होऊन DM किंवा IAS होऊ शकता. मात्र यासाठी तुम्हाला UPSC परीक्षेबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टीमाहिती असणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया. DM चे काम प्रशासन (Administration Jobs) आहे. ही सरकारी नोकरी मिळणे सोपे नाही. यासाठी परीक्षेसोबतच खडतर प्रशिक्षणही (IAS Officer Training) दिले जाते. चांगल्या पगार आणि अधिकारासोबतच या पदावरील लोकांना अनेक विशेष सुविधाही दिल्या जातात. म्हणूनच यासाठी UPSC परीक्षेच्या काही गोष्टी जाणून घेऊ. किती वेळा देऊ शकतो UPSC परीक्षा? DM होण्यासाठी उमेदवारांना पदवीधर असणे अनिवार्य आहे. UPSC परीक्षेला बसण्यासाठी वय 21 ते 32 वर्षे दरम्यान असावे. यामध्ये ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवार UPSC परीक्षा 6 वेळा देऊ शकतात तर OBC श्रेणीतील उमेदवार 9 वेळा UPSC परीक्षा देऊ शकतात. SC/ST उमेदवार कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतात. त्यांना कोणतीही मर्यादा नाही. कोणतीच परीक्षा नाही, टेस्ट नाही; पुण्यात ग्रॅज्युएट्सना मिळेल थेट नोकरी; उद्याच मुलाखत या विषयांची तयारी आवश्यक डीएम होण्यासाठी इंग्रजी, गणित, हिंदी, चालू घडामोडी, सामान्य अध्ययन आणि तर्क (UPSC विषय) या विषयांची तयारी करावी लागते. परीक्षेनंतरची मुलाखत खूप अवघड मानली जाते (UPSC मुलाखत). त्यामुळे विषयांचे गांभीर्याने व खोलवर वाचन करून ते लक्षात ठेवणे गरजेचे आहे. डीएम होण्यासाठी, यूपीएससी परीक्षेचे तीनही टप्पे - प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. Job Resume मधील एका फोटोमुळे गेली राहुलची नोकरी; मग फोटो असावा की नसावा? एक्सपर्ट्स म्हणतात... किती असतो DM चा पगार डीएमचा पगार (Salary of DM) सुमारे 56,100 रुपये इतका असू शकतो. त्याशिवाय त्यांना इतर सुविधा आणि भत्ते देखील दिले जातात. वेतनश्रेणी दरवर्षी वाढते. तसंच सरकारकडून अनेक सुविधा देण्यात येतात.
First published:

Tags: Career, Career opportunities, Ias officer, Upsc

पुढील बातम्या