मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Resume मधील एका फोटोमुळे गेली राहुलची नोकरी; मग फोटो असावा की नसावा? एक्सपर्ट्स म्हणतात...

Job Resume मधील एका फोटोमुळे गेली राहुलची नोकरी; मग फोटो असावा की नसावा? एक्सपर्ट्स म्हणतात...

फोटो असावा की नसावा?

फोटो असावा की नसावा?

कंपनीच्या रिक्रुटर्सना त्याचा अनप्रोफेशनल पण आवडला नाही आणि त्याला जॉब मिळू शकला नाही. पण इथून एक प्रश्न उपस्थित होतो. Resume मध्ये फोटो असावा की नसावा?

मुंबई, 21 सप्टेंबर: कोणताही जॉब मिळवण्यासाठी सुरुवातीला त्या कंपनी तुम्हाला Resume देणं आवश्यक असतं. जर त्या कंपनीतील वरिष्ठांना तुमचा Resume आवडला तरच तुम्हाला पुढील प्रोसेससाठी संधी दिली जाते. पण जर तुमच्या Resume मध्ये चुका असतील तर तुम्हाला कधीच बोलावण्यात येणार नाही. एका सामान्य कागदासारखी त्या Resume ची किंमत होईल. पण तुम्हाला जर तुमचा Resume असामान्यबनवायचा आहे तर Resume मध्ये कोणत्याही चुका ना करणं हा महत्त्वाचा भाग आहे. अशीच एक चूक राहुलने केली आणि हातची चांगल्या पगाराची नोकरी गमावली. पण ती चूक नक्की होती तरी कोणती? जाणून घेऊया. फ्रेशर्सना जॉब मिळत नाही किंवा उशिरा मिळतो यावर राहुलने सर्वांना आधीच उत्तर दिलं होतं. ग्रॅज्युएशन झाल्या झाल्याच त्याला मुलाखतीचे कॉल्स येऊ लागले होते. त्यामुळे घरचेही राहुलवर खुश होते. शिक्षणानंतर राहुलने आपल्या सिनिअर्सकडून Resume घेतला आणि त्या फॉरमॅटमध्ये आपली माहिती लिहून अपडेट केला. यामध्ये त्याने आपला फोटोही लावला. पण इथेच राहुल मोठी चूक करून बसला. मुलाखतीला जातं राहूल आपल्यासोबत रेशीम घेऊन गेला आणि पाच रिक्रुटर्सच्या पॅनेलसमोर तो Resume ठेवला. यानंतर राहुलचा Interview सुरु झाला. राहुलने मोठ्या हुशारीनं सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. अगदी टेक्निकल पासून सर्व गोष्टीत आत्मविश्वास राहुलनं दाखवला. मुलाखत झाल्यानंतर 'हा जॉब आपल्यालाच मिळणार' असा विचार राहुल करत होता. काही दिवसांनी मुलाखतीचा निकाल आला आणि राहुलचा चेहरा पडला. त्याच्यापेक्षा कमी असणाऱ्या मुलांचं सिलेक्शन झालं होतं मात्र राहुलचा सिलेक्शन झालं नव्हतं. आपण इतका चांगला Interview दिल्यानंतरही आपलं सिलेक्शन का होऊ शकलं नाही? असा प्रश्न त्याच्या मनात होता. त्याने थेट आपल्या शिक्षकांना फोन केला. शिक्षकांनी त्याचा Resume बघताच त्यांना राहुलची चूक समजली. त्यांनी ती राहुलला समजवून सांगितली. Data Science की Computer Science? नक्की कोणाला मिळतं जास्त पॅकेज? असं निवडा परफेक्ट करिअर राहुलच्या Resume मध्ये राहुलने जो फोटो लावला होता तो गेल्यावर्षी गोव्याला काढलेला फोटो होता. त्यात तो फोटो सेल्फी होता. त्यामुळे कंपनीच्या रिक्रुटर्सना त्याचा अनप्रोफेशनल पण आवडला नाही आणि त्याला जॉब मिळू शकला नाही. पण इथून एक प्रश्न उपस्थित होतो. Resume मध्ये फोटो असावा की नसावा? Resume मध्ये फोटो असावा की नसावा? खरं म्हणजे एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, Resume फोटो लावावा की नको ही प्रत्येकाची आवड निवड आहे. ज्यांना Resume मध्ये फोटो लावायचा आहे ते फोटो लावू शकतात. यावरून कंपनीमध्ये तुमचं जजमेंट होत नाही. मात्र तो फोटो नक्की कसा असावा? यावरून तुम्हाला जज केलं जाऊ शकतं. मग फोटो लावताना काय करावं आणि काय करू नये? काय करावं आणि काय करू नये? Resume मध्ये फोटो लावताना तो नेहमी प्रोफेशनलच असावा. फोटो लावताना पासपोर्ट साईझ म्हणजेच पोटापर्यंत दिसेल इतकाच फोटो असावा. तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करताय यावरून तुम्ही फोटोमधील कपड्यांची चॉईस करावी. शक्यतो फोटो हा ब्लर नसावा आणि स्पष्ट तुमचा चेहरा दिसेल असा असावा. Resume मधील फोटो हा कधीही सेल्फी किंवा कमी कपड्यातील असू नये. तुमच्या LinkedIn अकाउंट वर जो फोटो आहे तोच फोटो Resume मध्ये असावा म्हणजे तुमचा अकाउंट शोधण्यात कंपनीला मदत होईल. Resume मधील फोटो खूप मोठा किंवा खूप लहान असू नये. जॉबच्या सुरुवातीलाच मिळेल लाखो रुपयांचं पॅकेज; Software Technology मध्ये करिअरसाठी या टिप्स आवश्यक (Note: वरील सांगितलेली गोष्ट ही संपूर्णतः काल्पनिक असून तिचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना सजग करण्याचा आहे. ज्यामुळे त्यांना त्याचा जॉब गमवावा लागणार नाही.)
First published:

Tags: Career, Career opportunities, Digital prime time, Job, Job alert

पुढील बातम्या