वकिली सोडून UPSC ची केली तयारी, दुसऱ्याच प्रयत्नात मिळवला 8वा क्रमांक

वकिली सोडून UPSC ची केली तयारी, दुसऱ्याच प्रयत्नात मिळवला 8वा क्रमांक

पूर्व परीक्षेमध्ये नापास होऊनही वैशाली यांनी हिंमत सोडली नाही. त्यांनी या परीक्षेसाठी वेगळी रणनीती आखली.

  • Share this:

मुंबई, 24 मे : UPSC परीक्षेसाठी जवळपास 11 तास अभ्यास आणि जिद्द दोन्ही महत्त्वाची असते. दिवसरात्र अभ्यास एवढी सगळी मेहनत केल्यानंतर यश मिळालं नाही तर निराशा येते. पहिल्या प्रयत्नात झालं नाही म्हणून हिम्मत न हारता फरीदाबादच्या वैशाली सिंह यांनी पुन्हा परीक्षा दिली. दुसऱ्या वेळी मात्र त्यांनी भारतात 8 वा क्रमांक पटकावला आणि त्यांचं खूप कौतुक झालं. पण त्यांचा इथपर्यंतचा संघर्ष करा होता जाणून घ्या.

फरीदाबादच्या वल्लभगड इथल्या वैशाली रहिवासी. त्यांच्या कुटुंबामध्ये वकिलीची पार्श्वभूमी. त्यांची आई सुमन सिंह आणि वडीलही व्यवसायाने वकील आहेत. त्यांचा वारसा चालवत वैशाली यांनी कायद्याचा अभ्यास केला. वैशाली यांचा धाकटा भाऊही भाऊही वकीलच आहे. वैशाली यांनी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून 5 वर्षांचा BA-LLB कोर्स पूर्ण केला. त्यानंतर IAS व्हायचं असं ठरवलं त्यासाठी प्रयत्न सुरू केले.

चुकांमधून घेतला धडा

पूर्व परीक्षेमध्ये नापास होऊनही वैशाली यांनी हिंमत सोडली नाही. त्यांनी या परीक्षेसाठी वेगळी रणनीती आखली. त्या सांगतात, ही परीक्षा द्यायची असेल तर तुमच्या बलस्थानांपेक्षाही तुमच्या कमकुवत बाजूंवर जास्त लक्ष द्या. आपल्यातल्या उणिवा दूर करून परीक्षेला सामोरे गेलात तर यश तुमचंच आहे.

हे वाचा-दोन वेळच्या खाण्याचे वांदे असतानाही हरला नाही हिम्मत, खेचून आणलं त्यानं यश

हे वाचा-12 वी नापास झाल्यावर प्रियसीची मागितली साथ, जिद्दीच्या जोरावर झाले IPS अधिकारी

हे वाचा-Success story: कोचिंग क्लास न करता जिद्दीच्या जोरावर नर्स झाली IAS

संपादन- क्रांती कानेटकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 10:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading