पिरवोम, 17 मे : कठीण प्रसंगात जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर व्यक्ती नक्की यशस्वी होते. असंच काहीस झालं केरळमध्ये राहणाऱ्या एनीस कनमनी जॉय यांच्यासोबत. एका शेतकऱ्याची मुलगी ते नर्स आणि नर्स ते IAS ऑफिसर असा त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. एनीस यांचा जन्म केरळमधील पिरवोम जिल्ह्यातील पंपकुडा या छोट्याशा गावात झाला. त्याचे वडील पंपाकुडा गावात शेती करायचे. त्यांची आई शेतात वडिलांना मदत करायची. एनीस यांनी पीरवॉम जिल्ह्यातील शाळेतून दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. पुढील शिक्षणासाठी एर्नाकुलमला जावं लागलं. त्यानंतर त्रिवेंद्रम इथून नर्सिंगचं शिक्षण घेतलं. डॉक्टर होऊ न शकल्यानं एनीस खूप नाराज होत्या. पण आहे ती परिस्थिती स्वीकारून नर्सची नोकरी स्वीकारली. एका प्रवासादरम्यान त्यांना upsc कोचिंग क्लास करणाऱ्या एका तरुणीची भेट झाली. त्यावेळी त्यांना या परीक्षांची माहिती मिळाली मग मनात आलं आणि त्यांनी परीक्षा देण्याचा निश्चय केला. हे वाचा- वडील करायचे सिक्युरिटी गार्डची नोकरी, UPSC मध्ये मुलानं मिळवलं अव्वल यश आयएएस कोचिंग क्लाससाठी लाखो रुपये खर्च करणं घरच्या परिस्थितीमुळे एनीस यांना शक्य नव्हतं. घरची परिस्थिती गरबीची असल्यानं त्यांना स्वत: अभ्यास करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. म्हणूनच त्यांनी स्वतःहून अभ्यास करण्याचे ठरविले. एनीस सांगतात की ती वर्तमानपत्र वाचण्यास कधीच विसरली नाही आणि म्हणूनच त्यांचे सध्याचे व्यवहार नेहमीच अद्ययावत होत असे. 2010 मध्ये एनीस यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये अव्वल यश मिळवलं. मात्र, त्यांचे आयएएस होण्याचे लक्ष्य अपूर्ण राहिले. आपले ध्येय साध्य करण्यासाठी पुढच्या वर्षी एनीस यांनी पुन्हा परिश्रम घेतले आणि यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस 2011 च्या परीक्षेत 65 क्रमांक मिळविला आणि त्या आयएएस झाल्या. हे वाचा- एकेकाळी रस्त्यावर विकायचा बांगड्या…जिद्दीच्या जोरावर आज आहे IAS ऑफिसर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.