मुंबई, 22 मे : अपयश आलं की आपण आपलं धैर्य आणि संयम सोडतो किंवा अनेकदा टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला जातो. पण या अपयशातून न डगमगता धाडसानं उभं राहाणारे आयुष्यात खूप जास्त यशस्वी होतात. मनोज शर्मा 2005 रोजीच्या महाराष्ट्र कॅडरमधून IPS ऑफिसर झाले आहेत. त्यांनी हे यश कसं खेचून आणलं हे आपण आज यशोगाथा पाहणार आहोत.
मनोज शर्मा मुळचे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्याचे रहिवासी. 11वी पर्यंत शिक्षण नीट पार पाडलं पण 12 वीच्या परीक्षेत गाडी अडकली. महत्त्वाचं वर्ष नापास झाल्यामुळे वाया गेलं.
बारावीत नापास झाल्यानंतर मनोज आपल्या भावासोबत टेम्पो चालवत होते. एकदिवस पोलिसांनी त्यांचा टेम्पो जप्त केला. हा टेम्पो सोडवण्यासाठी ते ठाण्यात गेले तेव्हा त्यांनी पोलीस खात्यातील परीक्षांबाबत चौकशी केली. पैशाची चणचण असल्यानं पोटापाण्यासाठी काहीतरी उद्योगही पाहावा लागणार होता.
बारावी नापास असल्याचा ठप्पा अजूनही पिछा सोडत नाही. त्यामुळे ज्या मुलीवर प्रेम होते त्या मुलीलाही नीटसं मनातलं काही बोलू शकले नाहीत. त्यांना भीती होती बारावी नापास असल्याचं त्यांना ही मुलगी बोलू नये. म्हणून त्यांनी प्रेमाखातर अभ्यास सुरू केला. संघर्ष करून दिल्लीला आले पैशाची गरज होती. मोठ्या घरात त्यावेळी कुत्रे पाळले जात होते. त्यांना सांभाळण्यासाठी 400 रुपये मिळायचे.शर्मा यांनी पहिला अटेंम्ट क्लिअर केला पण त्यानंतर दुसरा आणि तिसऱ्या अटेंम्टमध्ये प्रेमात असल्यानं त्यांना काही सूचत नव्हतं. त्यांनी अखेर त्या मुलीजवळ आपल्या मनातील प्रेम व्यक्त केलं. तू फक्त साथ दे मी सगळं नीट करेन मी दुनिया बदलेनं असं आश्वासनही दिलं. त्यानंतर चौथ्या प्रयत्नामध्ये 121 व्या क्रमांकानं परीक्षेत अव्वल यश मिळवलं. मनोज यांनी ग्वाल्हेरमधून पोस्ट ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं.
मनोज शर्मा यांच्यावर अनुराग पाठक यांनी 'बारावी फेल, हारा वही जो लडा नहीं' हे पुस्तक लिहिले आहे. आयुष्यात छोट्या गोष्टींसमोर हा मानणाऱ्या मुलांसाठी प्रेरणा देण्यासाठी ही कथा असेल असं अनुराग यांनी एका मुलाखतीत सांगितले. महाराष्ट्र केडरमधून आयपीएस बनलेले मनोज पश्चिम मुंबईचे अतिरिक्त आयुक्त म्हणून मुंबईत कार्यरत आहेत.
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.