जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / UPSC Result 2022: मोठी बातमी! UPSC परीक्षेचा निकाल जाहीर, इशिता किशोर देशात ठरली अव्वल

UPSC Result 2022: मोठी बातमी! UPSC परीक्षेचा निकाल जाहीर, इशिता किशोर देशात ठरली अव्वल

यूपीएससीचा निकाल जाहीर

यूपीएससीचा निकाल जाहीर

UPSC CSE Result 2022: UPSC परीक्षा 2022 आणि मुलाखती दिलेल्या उमेदवारांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा 2022 चा निकाल जाहीर केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 मे: UPSC परीक्षा 2022 आणि मुलाखती दिलेल्या उमेदवारांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा 2022 चा निकाल जाहीर केला आहे. मुलाखतीला उपस्थित असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. निकालासोबतच टॉपर्सची यादीही जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे UPSC मुलाखत संपल्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी निकाल जाहीर झाला आहे. UPSC CSE प्राथमिक परीक्षा 5 जून 2022 रोजी घेण्यात आली आणि परीक्षेचा निकाल 22 जून रोजी जाहीर झाला होता. 16 ते 25 सप्टेंबर दरम्यान मुख्य परीक्षा घेण्यात आली आणि 6 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला होता. त्यानुसार निवड कार्फण्यात आलेल्या उमेदवारांच्या 18 मे रोजी मुलाखती संपल्या होत्या. त्यांनतर अवघ्या काहीदिवसातच निकाल जाहीर करण्यात आला आहे. नक्की किती असतो एका IAS अधिकाऱ्याचा पगार? कोणत्या मिळतात सुविधा? A-Z माहिती UPSC ने जाहीर केलेल्या निकालानुसार, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट ‘A’ आणि गट ‘B’ मध्ये नियुक्तीसाठी एकूण 933 उमेदवार यशस्वी घोषित झाले आहेत. 933 यशस्वी उमेदवारांपैकी 345 सामान्य श्रेणीतील, 99 EWS, 263 OBC, 154 SC, 72 ST प्रवर्गातील आहेत. या परीक्षेद्वारे IAS साठी 180, IFS साठी 38, IPS साठी 200, केंद्रीय सेवा गट ‘A’ साठी 473 आणि गट ‘B’ सेवांसाठी 131 पदे भरण्यात आली आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

इशिता किशोरने यंदा अव्वल स्थान पटकावले आहे. यानंतर गरिमा लोहियाला दुसरे तर उमा हर्थीला तिसरे स्थान मिळाले आहे. UPSC कडून टॉपर विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काय सांगता! आता टीव्हीवरील प्रोग्राम बघूनही क्रॅक करता येईल UPSC परीक्षा? ‘हे’ कार्यक्रम मिस करूच नका असा चेक करा निकाल याप्रमाणे UPSC IAS निकाल पहा UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. मुख्यपृष्ठावर दिलेल्या UPSC 2022 अंतिम निकालाच्या लिंकवर क्लिक करा. परिणाम तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता रोल नंबरच्या मदतीने तपासा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात