जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / नक्की किती असतो एका IAS अधिकाऱ्याचा पगार? कोणत्या मिळतात सुविधा? A-Z माहिती

नक्की किती असतो एका IAS अधिकाऱ्याचा पगार? कोणत्या मिळतात सुविधा? A-Z माहिती

नक्की किती असतो एका IAS अधिकाऱ्याचा पगार? कोणत्या मिळतात सुविधा? A-Z माहिती

आयएएस बनल्यावर केवळ उत्तम वेतनच नव्हे, तर इतरही अनेक लाभ मिळतात. त्याबद्दल अधिक माहिती घेऊ या

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 मे:   केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये दर वर्षी देशातले अनेक तरुण उत्तीर्ण होतात. ही परीक्षा अतिशय कठीण समजली जाते. त्यासाठीची तयारी उमेदवारांना खूप आधीपासून सुरू करावी लागते. विद्यार्थी पदवी परीक्षा देता देता या परीक्षेचा अभ्यास सुरू करतात. त्यासाठी स्वतंत्र क्लासेस लावतात. अर्थात इतकी मेहनत घेऊन मिळणारं फळही सर्वोत्तम असतं. कारण यूपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांना आयएएस बनण्याची संधी मिळते. त्याव्यतिरिक्त आयपीएस, आयएफएस अधिकारीही बनता येतं; मात्र आयएएस म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेतील नोकरी प्रतिष्ठेची समजली जाते. त्यामुळेच या पदांना वलय प्राप्त झालं आहे. आयएएस बनल्यावर केवळ उत्तम वेतनच नव्हे, तर इतरही अनेक लाभ मिळतात. त्याबद्दल अधिक माहिती घेऊ या. ‘डीएनए इंडिया’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

IAS अधिकाऱ्यांना मिळणारं वेतन आणि  इतर लाभ केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयएएस अधिकाऱ्याला वेतनासह इतर कोणते लाभ मिळू शकतात, याविषयी जाणून घेऊ या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगलं यश मिळवणारे उमेदवार आयएएस या पर्यायाची निवड करतात व उत्तम आयएएस अधिकारी बनतात. कोणी 84व्या वर्षी तर कोणी 96 व्या वर्षी घेतली पदवी; शिक्षणासाठीची जिद्द बघून तरुणांनाही वाटेल लाज भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांना सरकारतर्फे उत्तम मोबदला दिला जातो. उत्तम वेतन व इतर लाभ यामुळे आयएएस होण्याकडे अनेकांचा कल असतो. सातव्या वेतन आयोगाच्या नियमांनुसार, आयएएस अधिकाऱ्याचं मूळ वेतन 56,100 रुपये असतं. वेतनाव्यतिरिक्त आयएएस अधिकाऱ्यांना ट्रॅव्हल अलाउन्स (TA) आणि डिअरनेस अलाउन्स (DA) म्हणजे महागाई भत्ता दिला जातो. आयएएस अधिकाऱ्याचं एकूण वेतन महिन्याला एक लाख रुपयांपेक्षा जास्त असतं. फ्रेशर्स उमेदवारांसाठी मोठी खूशखबर! ‘ही’ मोठी IT कंपनी येत्या वर्षी 15,000 जणांना देणार नोकरी चांगल्या श्रेणीवरच्या आयएएस अधिकाऱ्याचं मासिक वेतन 2.5 लाखांपर्यंत पोहोचू शकतं. गृहसचिव हे आयएएस केडरमधलं सर्वोच्च पद असतं. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा लाभही आयएएस अधिकाऱ्यांना घेता येतो. त्याशिवाय निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधाही असते. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे आयएएस तसंच आयपीएस (भारतीय पोलीस सेवा), आयआरएस (भारतीय महसूल सेवा), आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवा) या पदांवरही नोकरी मिळू शकते. प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण होणं ही सोपी गोष्ट नसते. त्यासाठी भरपूर अभ्यास व मेहनत घ्यावी लागते. त्यामुळेच ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या तुलनेनं कमी असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात