मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Upcoming Government Jobs 2022: युपीएससी ते एमपीएससी, एनडीए ते रेल्वेपर्यंत नवीन वर्षात भरपूर नोकऱ्या, संपूर्ण यादी पहा

Upcoming Government Jobs 2022: युपीएससी ते एमपीएससी, एनडीए ते रेल्वेपर्यंत नवीन वर्षात भरपूर नोकऱ्या, संपूर्ण यादी पहा

 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरती

Upcoming Government Jobs 2022: पुढील UPSC, MPSC, SSC, RRB सह अनेक मोठ्या भरती मंडळांद्वारे पराक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. याशिवाय वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या अनेक भरती परीक्षाही 2022 मध्ये होणार आहेत.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 24 डिसेंबर : सरकारी नोकरी (Government Jobs) मिळावी अशी बहुतांश लोकांची इच्छा असते. देशभरातील विविध सरकारी नोकऱ्यांसाठी येणाऱ्या अर्जांवरुन याचा अंदाज येतो. सरकारी नोकरी करताना देशसेवा करण्याची संधी मिळते, म्हणूनही अनेकजण या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करत असतात. तुम्ही देखील तोच विचार करत असाल तर पुढील वर्षी सरकारमधील विविध क्षेत्रांत अनेकपदांसाठी भरती होणार आहे. चला सविस्तर जाणून घेऊया.

2022 हे वर्ष भरती परीक्षांचे वर्ष असणार आहे. (Upcoming Government Exams 2022) पुढील वर्षी UPSC, MPSC, SSC, RRB सह अनेक मोठ्या भरती मंडळांद्वारे परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. याशिवाय वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या अनेक भरती परीक्षाही 2022 मध्ये होणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस आरआरबी ग्रुप डी परीक्षा 2021 (RRB Group D Exam 2021) होणार आहे. याशिवाय, RRB NTPC CBT 2 च्या तारखा देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

2022 च्या आगामी मोठ्या भरती परीक्षा (Upcoming Government Exams 2022) वर एक नजर टाकूया. त्यापैकी काहींच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, तर काहींची अधिसूचना येणे बाकी आहे.

युपीएससी सीएसई आणि युपीएससी आयएसएस UPSC CSE 2022 & UPSC IFS 2022

केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे जारी केलेल्या वर्ष 2022 च्या भरती परीक्षा दिनदर्शिकेनुसार सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स (UPSC Civil Services Pelims 2022) आणि भारतीय वन सेवा प्रिलिम्स (UPSC IFS Prelims 2022) साठी आयोग 2 फेब्रुवारीला अधिसूचना जारी करणार आहे. यासोबतच परीक्षांची नोंदणीही सुरू होईल. दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2022 असेल. त्यानंतर नागरी सेवा (UPSC CSE 2022) आणि भारतीय वन सेवा (UPSC IFS 2022) च्या पूर्व परीक्षा 5 जून रोजी होणार आहेत. नागरी सेवा मुख्य परीक्षा (UPSC Civil Servic Mains 2022) 16 सप्टेंबर 2022 रोजी घेतली जाईल. त्याचवेळी, भारतीय वन सेवेसाठी मुख्य परीक्षा (UPSC IFS Mains 2022) 20 नोव्हेंबर 2022 रोजी घेतली जाईल.

SBI Jobs: हा गोल्डन चान्स सोडू नका; स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई इथे नोकरीची संधी

UPSC NDA 1 & UPSC CDS 1

यूपीएससी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (UPSC NDA 2022) आणि संयुक्त संरक्षण सेवा (UPSC CDS 2022) च्या पहिल्या परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया 22 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. ज्यासाठी उमेदवार 11 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतील. 10 एप्रिल 2022 रोजी परीक्षा होणार आहेत. त्याचवेळी, UPSC NDA 2022 आणि UPSC CDS 2022 च्या दुसऱ्या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 18 मे ते 14 जून या कालावधीत आयोजित केली जाईल. तर 4 सप्टेंबर 2022 रोजी परीक्षा होणार आहे.

RRB Group D Exam 2022

अडीच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, रेल्वे भर्ती बोर्ड, RRB ने अखेर गट डी भरती परीक्षेच्या (RRB Group D Exam 2022) तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार RRB ग्रुप डी परीक्षा 2022 ची परीक्षा 23 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होईल. परीक्षा अनेक टप्प्यात घेतली जाईल. परीक्षा केंद्र आणि तारखेची माहिती परीक्षा सुरू होण्याच्या 10 दिवस आधी RRB च्या अधिकृत आणि प्रादेशिक वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. त्याचवेळी, उमेदवारांची प्रवेशपत्रे देखील परीक्षेच्या (RRB Group D Exam 2022) 4 दिवस आधी जारी केली जातील. यापूर्वी, RRB उमेदवारांसाठी 15 ते 26 डिसेंबर 2021 या कालावधीत अर्जातील दुरूस्तीसाठी सुधारणा लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.

RRB NTPC CBT 2 Exam 2022

गट डी भरती परीक्षेसोबतच आरआरबीने नॉन टेक्निकल पॉपुलर श्रेणीतील ओयजित आरआरबी एनटीपीसी सीबीटी 2 परीक्षा (RRB NTPC CBT 2 Exam 2022) तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार आरआरबी एनटीपीसी सीबीटी 2 परीक्षा (RRB NTPC CBT 2 Exam 2022) 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत घेतली जाईल. ज्याद्वारे एकूण 35,208 एनटीपीसी पदे भरली जातील. याअगोदर NTPC फेज I परीक्षा म्हणजेच RRB NTPC CBT 1 Exam 2021 चे आयोजन 7 टप्प्यांत घेण्यात आली होते. जे 28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. RRB NTPC CBT 1 परीक्षा 2021 चा निकाल देखील 15 जानेवारी 2022 पर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. जे RRB च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल.

Job Alert: राज्यातील 'या' फार्मसी कॉलेजमध्ये विविध जागांसाठी होणार भरती

SSC Exam Calendar 2022

कर्मचारी निवड आयोग, एसएससीने 2022 च्या आगामी भरती परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक देखील प्रसिद्ध केले आहे. आयोगाने CGL, CHSL, MTS, स्टेनोग्राफर, GD कॉन्स्टेबल (SSC GD Constable Exam 2022) यासह अनेक भरती परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

SSC CGL 2022 & SSC CHSL 2022

एसएससीने जारी केलेल्या परीक्षा दिनदर्शिकेनुसार (SSC Exam Calendar 2022) एकत्रित पदवी स्तर, SSC CGL 2022 आणि एकत्रित उच्च माध्यमिक स्तर स्तर-1, SSC CHSL 2022 च्या परीक्षा एप्रिल आणि मे 2022 मध्ये घेतल्या जातील. मात्र, आता आयोगाने परीक्षांच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या आहेत. SSC CGL 2022 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. एसएससी सीएचएसएल 2022 साठी तेच 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होईल.

तर मल्टी टास्किंग स्टाफ (SSC MTS 2022) पदांसाठी भरतीसाठी परीक्षा जून 2022 मध्ये घेतली जाईल. याशिवाय जीडी कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी परीक्षा (SSC GD Constable Exam 2022) जूनमध्ये घेतली जाईल.

Resume Tips: बायोडेटा बनवताना काही नियमांमध्ये करा बदल; तुम्हालाच मिळेल नोकरी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने गट क पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, राज्यात एकूण 900 पदांची भरती केली जाणार आहे. गट क पदांवर (MPSC Group C Recruitment 2021) जाहीर झालेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 22 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2022 आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in ला भेट द्यावी लागेल.

First published:

Tags: Mpsc examination, Upsc, Upsc exam