मुंबई, 01 फेब्रुवारी: आज म्हणजेच 01 फेब्रुवारी 2022 ला देशाच्या संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारमण
(Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आर्थिक वर्ष 2022-23 चं सर्वसाधारण बजेट
(Union Budget 2022) सादर केलं. या बजेटमध्ये अगदी कार्पोरेट क्षेत्रांपासून
(Announcements for corporates in Union Budget 2022) तर सर्वसाधारण लोकांपर्यंत
(Common people benefits in Union Budget 2022) सर्वांच्याच फायद्यासाठीच्या घोषणा करण्यात आल्यात. यामध्ये शिक्षण
(Education field announcements in Union Budget 2022) आणि रोजगार
(employment announcements in Union Budget 2022) क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.
देशातील वाढती बेरोजगारी आणि कमी होणारं नोकऱ्यांचं प्रमाण यावरही घोषणा करण्यात आली. तर जगभरात ट्रेंडिंग असणारं डिजिटल शिक्षण
(Digital education) आणि डिजिटल लर्निंग
(Digital Learning) यबद्दलही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. नक्की विद्यार्थ्यांसाठी आणि रोजगार नसलेल्या उमेदवारांसाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या याबद्दल जाणून घेऊया.
Budget 2022: या वर्षात सुरू होणार 5G मोबाइल सर्विस, अर्थमंत्र्यांची घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शिक्षणाबाबत केलेल्या घोषणांमध्ये डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी डिजिटल युनिव्हर्सिटी
(Digital University) निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वन क्लास वन टीव्ही चॅनल 200 टीव्ही चॅनलपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पूर्वीपासून असलेल्या सुविधांचा विस्तार करण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे.
प्रादेशिक भाषांमध्ये येणार 200 टीव्ही चॅनेल्स
अर्थमंत्री सीतारणम यांनी शिक्षणात सुधारणा करण्याच्या आणि प्रत्येक मुलासाठी शिक्षण सुलभ करण्याच्या उद्देशानं सुरू केलेले पूरक शिक्षण प्रादेशिक भाषांमधील 200 टीव्ही चॅनेलद्वारे
(Educational Tv channel for students) इयत्ता 1 ते 12 वीच्या मुलांपर्यंत पोहोचवले जातील अशी घोषणा केली आहे. आतापर्यंत फक्त 12 टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून मुलांना शिक्षण मिळत होतं. मात्र आता हे संख्या वाढवून 200 करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत शिक्षण घेता येणार आहे.
60 लाख लोकांना मिळणार रोजगार
देशात वाढत जाणारं बेरोजगारीचं प्रमाण लक्षात घेता. देशात येणाऱ्या आर्थिक वर्षांमध्ये तब्बल 60 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल अशी घोषणा अर्थमंत्री सीतारणम यांनी केली आहे. त्यामुळे बेरोजगारांना थोडा दिलासा मिळाला आहे. तसंच गरिबांसाठी 80 लाख घरे बांधली जातील. त्याचे बजेट 48000 कोटी रुपये आहे. 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट जारी केले जातील, ज्यात एक चिप असेल. परदेशात जाणार्यांना आराम मिळेल. पोस्ट ऑफिसमध्येही आता एटीएम उपलब्ध होणार आहेत.
Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त? आणि काय महाग? वाचा सविस्तर...
डिजिटल कंटेन्टवर भर देणार
उच्च दर्जाची ई-सामग्री प्रदान करण्यासाठी उत्तम शिक्षक तयार केले जातील. डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी डिजिटल विद्यापीठ निर्माण करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. ज्यामध्ये ISTE मानकानुसार जागतिक दर्जाचे दर्जेदार शिक्षण दिले जाईल. देशात सध्या सुरू असलेले कौशल्य विकास कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तरुणांना कार्यक्षम आणि पुन्हा कुशल बनवण्यासाठी डिजिटल देश ई-पोर्टल देखील सुरू केले जाईल. त्याचबरोबर सर्व राज्यांतील आयटीआय कौशल्य विकासाचे हे अभ्यासक्रम चालवले जातील अशीई घोषणा करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.