जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / शेतकऱ्याचा पोऱ्या तो! ना क्लास, ना पैसा; 5 वर्ष लढला पण आता IPS झाला

शेतकऱ्याचा पोऱ्या तो! ना क्लास, ना पैसा; 5 वर्ष लढला पण आता IPS झाला

शेतकऱ्याचा पोऱ्या तो! ना क्लास, ना पैसा; 5 वर्ष लढला पण आता IPS झाला

घरची परिस्थितीत बेताची होती. पण या परिस्थितीसह अनेक अडचणींवर मात करून कांतीलालने यश प्राप्त केले.

  • -MIN READ
  • Last Updated :

इम्तियाज अली, प्रतिनिधी भुसावळ, 05 ऑगस्ट : 2019 च्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)चा निकाल जाहीर झाला आहे. अत्यंत खडतर अशा या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील छोट्याशा गावातील कांतीलाल सुभाष पाटील हे कठोर मेहनत करून यश मिळवले असून त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 2019 साली घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी घोषित करण्यात आला असून यात भुसावळ तालुक्यातील कांतीलाल सुभाष पाटील हे 418 रँक मिळवून उत्तीर्ण झाले आहे. मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा, दाम्पत्याला धडक देऊन कार उलटली नाल्यात, दोघे जागीच ठार कांतीलाल याचे वडील हे शेती करतात. घरची परिस्थितीत बेताची होती. पण या परिस्थितीसह अनेक अडचणींवर मात करून कांतीलालने यश प्राप्त केले. कांतीलालने आधी आपल्या गावीच अभ्यास केला. त्यानंतर पुढील अभ्यासाठी तो पुण्यात पोहोचला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे घरून जास्त पैसेही मिळत नव्हते. त्यामुळे  कुठलाही महागडा क्लास कांतीलालने लावले नाही. नीट अभ्यासाचे नियोजन केले आणि  कठीण मेहनत करून त्यांनी हे यश मिळविले आहे. दिनो मोर्याने नारायण राणेंना ठरवलं खोटं, केला महत्त्वाचा खुलासा कांतीलाल यांचे प्राथमिक शिक्षण हे गावात झाले असून माध्यमिक शिक्षण हे वरणगाव येथे झाले आहे. पुढे नाशिक येथील के. के. वाघ या अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी या विषयात आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगत पुणे येथे यूपीएससी चा अभ्यास सुरू केला. सलग 5 वर्ष आलेल्या अपयशानंतरही खचून कठीण मेहनत करून त्याने हे यश मिळवले आहे. या यशात  त्यांना त्यांच्या कुटुंब आणि मित्रांचे सहकार्य लाभले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात